आभास हा... आभास हा...
होतो तुला होतो मला....आभास हा ||
कधी क्षण भर
कधी स्वप्न सार
मज आठवते आज का
का हे दिसे मनी वसे
तो आभास माझ्या मना
आधी असावं तू नसावं तू... सांग ना
होई भास का रे
नसताना तू मला ||
आभास हा आभास हा
Dreamword......✍️✍️✍️✍️
आभास हा... आभास हा...
होतो तुला होतो मला....आभास हा ||
कधी क्षण भर
कधी स्वप्न सार
मज आठवते आज का
का हे दिसे मनी वसे
तो आभास माझ्या मना
आधी असावं तू नसावं तू... सांग ना
होई भास का रे
नसताना तू मला ||
आभास हा आभास हा
Dreamword......✍️✍️✍️✍️
मला यायचं आहे तुझ्यासोबत
मला जगायचंय तुझ्यासोबत
मला श्वास घ्यायचंय तुझ्यासोबत
मला माझ्या आयुष्याची वाट
बघायची y तुझ्यासोबत
स्वप्न पण पाहिलं मी तुझ्यासोबत
पण.............
😔😔😔😔
हे माझं आयुष्य खेळ खेळत आहे माझ्यासोबत
काय करू यार हे काय होतंय माझ्यासोबत
मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय
पण......
हे माझं नशीब नाही राहू देत तुझ्यासोबत
पण....
मला मारायचं पण आहे तुझ्याच सोबत...
Dreamword....✍✍✍✍✍
कळत नाहीय मला की त्या
वेळेन यावं की नाही यावं पुन्हा...
मी स्त्री म्हणून जन्म घेतला हा
होता का माझा तो गुन्हा....
कळत नाहीय मला की हा समाज मी स्त्री
असल्याची का करून देतोय मला जाणीव
कोणत्या गोष्टीची मी पूर्ण करू शकत नाही उणीव
मग या वेळेन यावं की नाही यावं पुन्हा
जिच्या उदरातुनच हा समाज निर्माण झाला
मग तिच्याच चारित्र्यावर डाग का लावून गेला
मग का तिला स्त्री म्हणून हिनवून गेला
मग तिच्या त्या वेलेन यावं की नाही यावं पुन्हा...
स्त्री म्हणून जन्म घेतला हाच का तिचा गुन्हा.....
तिच्या सर्व इच्छांना मारत जाते
जे पुढे आलं त्यालाच स्वीकारते
दुसऱ्यांसाठी तिच्याच सुखाचा त्याग करते
तरी पण तीच का प्रत्येक गोष्टीत हिनवते....
मग तिच्या त्या वेलेण यावं की नाही यावं पुन्हा...
स्त्री म्हणून जन्म घेतला हाच तिचा गुन्हा.....
- sapna patil.....
विषय - माहेरची आठवण
प्रकार - चारोळी
पायी रुतला रे काटा
रंघत निंघतिया त्यातून...
आठवण माहेरची
तव्हा यतिया राहून....
Sapna patil ✍️
विषय - शेतीवाडी
प्रकार - चारोळी
शेतीवाडी केली...
पावसानं वाहून नेली...
कर्ज होतं माझ्या उरी...
आत्महत्येची पाळी आली...
Sapna patil ✍️
सारे काही सोडून...
एक दिवस सगळ काही सोडून जायचच असते....
तो दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच असतो....
हे माहीत असूनसुद्धा हा माणूस स्वार्थी मनाने का जगतो....
काहीच आपल नसते तरीही काही ना काही मिळवण्याच्या अपेक्षा का ठेवतो....
त्या अपेक्षांच्या पाठीमागं लागून का त्याच्या दुखाच कारण ठरतो....
एक दिवस तर सगळ काही सोडून जायचच असते....
जे मिळालंय त्यात सुख कधी मानतच नसतो....
आणि जे पाहिजे त्या अपेक्षांच्या पाठीमागं लागत असतो....
हे माहीत असून सुद्धा एक दिवस हे सगळ सोडून जायचच आहे तरीपण सर्व काही माझ माझं आहे अस म्हणत असतो....
काहीच सोबत घेऊन जात नसतो....
सर्व काही मिळवलेले इथंच सोडून जातो....
आणि सोडून जातो ते फक्त कुणाशी बोललेल गोड शब्द.....
आणि हेच तो सोबत घेऊन जातो.....
एक दिवसात सर्व काही मिळवलेले सोडून जायचच आहे हे तो विसरूनच जातो......
कधी तुला दुखावणार नाही
कधी तुला रडवणार नाही
पण तुला हसवेल मी
पण तुझ्या भावनांना कधी छेडणार नाही
फक्त एकदा येऊ दे मला
आयुष्यात तुझ्या
शपथ घेऊन सांगते
कधी तुझ्या आयुष्यासोबत खेळणार नाही
देईल तुझी शेवटपर्यंत साथ
मागे कधी हटणार नाही
तू भेटलास मला पुन्हा एकदा
तर परत तुला कधीच सोडणार नाही....
Sapna patil ✍️✍️✍️
ती काळ रात्र.....
ती काळ रात्र आली होती माझ्या आयुष्यात....
त्या रात्री तो हे जग सोडून गेला....
काहीच मागितले नव्हते त्याला मी कधीच....
पण न मागताच मला सर्व काही देऊन गेला...
कधीच विसरणार नाही मी ती रात्र....
कदाचित तो पण विसरू शकणार नाही मला...
म्हणून तो काहीतरी मागे सोडून गेला....
आणि सोडलाय त्याने मला....
मी कधीच नाही विसरणार त्याला....
ती काळ रात्र आली होती माझ्या आयुष्यात.....
त्या रात्री तो हे जग सोडून गेला.....
Sapna...✍✍✍
अंधारमय जगणं....
कस असत ना हे जीवन... कितीही आपल आयुष्य दुःखाने भरलेलं असेल तरीही... आपल्या ओठांवरील ते हास्य घेऊन फिरत असतो यालाच तर म्हणतात ना अंधारमय जगणं....
जी व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला हवी नसली....
तरीही तिला आपल्या आयुष्यातून बाहेर काढता येत नाही....
आणि जी व्यक्ती आपल्या आयुष्यात हवी असली तरीही त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणू शकत नाही....असच तर असत ना आयुष्य.... यालाच तर म्हणतात ना अंधारमय जगणं....
वाटते मला पण तुझा हा एकटे पण दूर करण्यासाठी मी तुझ्याजवळ यावं...
तुझा त्रास दूर करावा... खूप वाटते मला...
तुला माझ्या कुशीत घेऊन शांत करावं ....
तुझी ती चिडचिड बघून वाटत होत मला पण की तुझा तो चिडचिड पण दूर करावं...
जगाच्या नजरेनं माझ्याजवळ सर्व काही आहे रे पण माझ्या नजरेनं माझ्याजवळ काहीच नाहीय...
मी पण एकटीच आहे...
कधी करशील का माझा हा एकटेपणा दूर...
वाट बघेल मी आयुष्यभर तुझी...
तुझ्या त्या भेटीची...
नकोय मला तुझा तो स्पर्श पण...
हवंय मला तुझ ते प्रेम...ज्याची मी वाट बघतेय...
तो सुवर्ण दीन पुन्हा येवो... आयुष्यात माझ्या...
तुझ्याशिवाय उरलाय आयुष्यात एकांत माझ्या...
Sapna patil....✍✍✍✍✍
ओढ तुझ्यात ही आहे....
ओढ माझ्यात ही आहे....
तरीपण का ती आपल्यात ओळ आहे...
ती ओळ आपल्यात मला नको आहे...
ती ओढ मात्र आपल्यात मला हवी आहे...
आणि तीच ओळ माझं मला नकोस आयुष्य बनून उभी आहे...
म्हणून तुलाच ती ओळ मिठवयची आहे....
कधी करशील का नाहीस त्या ओळीला....
अस promiss कर मला.....
Sapna patil...✍✍✍
thank you......
समाज घातक
स्वतःच जीवन जगताना समाजाच्या दृष्टीने जीवन जगावे लागते. असे केलं तर समाज काय म्हणेल तसा केलं तर समाज काय म्हणेल. आपण काही वेगल राहील तर समाज काय म्हणेल. समाज पायी पण चालू देत नाही आणि घोड्यावर पण बसू देत नाही. मग आपण केव्हा जगायचं . समाजाच्या नादाला लागून आपण आपल्या च इच्छांना मारायचं का. एखादी स्त्री घराबाहेर पडते तेव्हा तिच्या कडे बघण्याचा हा समाजाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो.
तेव्हा तिच्याकडे हा समाज वाईट नजरेने बघतो. आणि जो पर्यंत ती एका घराच्या कोपऱ्यात गुलामगिरीत बसून असते तिला हा समाज चांगलं म्हणतो. मग अस करतो हा समाज. तिच्या इच्छा असतात. तिला पण मन आहे. तिला पण मोकळा श्वास घ्यायचा असतो. मग का हा समाज तिला स्त्री म्हणून हिनवतो.. का ती एक स्त्री आहे म्हणून तिला आठवण करून देतो. कोण आहे हा समाज आपल्या स्वतःच्या आयुष्यात भाग घेणारा. साध्या मनाने राहील तरी म्हणतात साधी आहे. ताठ मानेने चालेल तरी म्हणतात शिष्ट आहे. एखाद्या मुलासोबत बोललो तर मग तर वाया गेलेली आहे. मग मुलींनी या समजत बागवे तरी कसे हेच काळात नाही. घेऊ द्या ना आम्हाला पण उंच भरारी त्या आकाशातील पक्षाप्रमाणे. घेऊ द्या आम्हाला पण तो मोकळा श्वास. का आम्ही एक स्त्री आहे म्हणून गुलामगिरीत राहायला हवे का . तास राहील तर समाजाला मान्य आहे. एखादी स्त्री जर का काही करायला लागली तर हाच समाज तिचे पाय मागे खेचतो. एखाद्या स्त्रीला जर तिचा नवरा त्रास देत असेल आणि ती मुलगी दुसऱ्या एखाद्या मुळासोबत तीच स्वप्न रंगत करत असेल तर तेव्हा पण हाच समाज तिला आडवा येतो. आणि ती मुलगी अशीच आयुष्यभर मर मर करत राहते. काय अधिकार आहे या समाजाला आम्हा स्त्रियांना हीनवण्याचा. या समाजाचा विचार करत बसले तर आयुष्य जगायचं ह राहून जाईल. आणि या सगळ्या कारणांनी च आपला भारत देश मागे राहिलाय... आणि इतर देशांनी चांगली उन्नती केली आहे. जो पर्यंत हे मागासलेले विचार बदलणार नाही तोपर्यंत असच आयुष्य जगावं लागणार आहे..... असा हा समाज आपल्यासाठी घातक आहे....
Sapna patil....✍✍✍
एकदा माझ्या मनाला भास होऊन गेलं...
माझं मन बोलायला लागलं
आणि शू श....तो आहे तिथं अस सांगून गेलं...
मन अगदी थरथरू न गेलं...
आणि शू.....तो आहे तिथं अस सांगून गेलं...
शेवटी मनाचं पूर्ण पाणी होऊन गेलं...
मन बोलायला लागलं....
आणि शू.... तो आहे तिथं अस सांगून गेलं....
आणि शेवटी मन खूप घाबरुन गेलं....
नंतर समजल की ते काही भास नसून एक स्वप्नच होऊन गेलं....
मग काय शू.....तो आहे तिथं.... अस माझं स्वप्नच सांगून गेलं....
Sapna patil......✍️✍✍✍
नात तुझ माझं....
नात तुझ माझं सात जन्मच...
ते आता कधीच तुटू नाही द्यायचं...
बांधून ठेऊ त्या सात जन्माच्या गाठी...
त्यांना कधी सुटू नाही द्यायचं...
नात तुझ माझं अजून घट्ट करायचं...
की त्या वाईट संशयाला जागाच नाही द्यायचं...
नात तुझ माझं असच टिकून ठेवायचं...
त्याला आता कधीच तुटू नाही द्यायचं...
Sapna patil......✍️✍✍✍✍✍
स्पर्श तुझा.......
संध्याकाळच्या गारव्यात तुला मी आठवलं...
जणू काही तुझा स्पर्श झाला अस जाणवलं...
तो अंगाला झोंबणारा थंडगार वारा मनाला स्पर्श करून गेला... आणि
तुझं ते गोंडस प्रतिबिंब मनात साठवल...
तो संध्याकाळचा गारवा तुझी चाहूल देत होता,
आणि तुझी चाहूल येताच मनाला हुरहूर जाणवलं...
पावसाच्या रिमझिम सरित तू मला अल्लड नजरेनं पाहिलं...
मग मी तुझ्या हळूच जवळ येऊन मी मला तुझ्या डोळ्यात शोधलं...
डोळ्यात तुझ्या पाहताच मला माझं प्रेम दिसलं...
विजेचा कडकडाट होताच तू मला अजुन जवळ घेतलं...
नात ते आपलं सात जन्मच अजून घट्ट झालं....
आणि त्या पावसाच्या सरीत आपण एकमेकांत इतके गुंतलो की वेळेचं भानच नाही राहिलं...
आणि वेळ इथंच थांबावी अस वाटलं....
Sapna patil....✍️✍️✍️✍️✍️
आर्त हाक.......
Request...... ती येत आहे जन्म घेऊन......
जन्म घेऊन येत आहे मी तुझ्या आयुष्याची
वाट बनायला तू बघ....
पण त्या आधी बघू दे तू मला पण हे जग...
जन्म घेऊन येत आहे मी माणसातील
माणुसकी जिवंत करायला तू बघ....
पण त्या आधी तू बघू दे मला हे जग....
जन्म घेऊन येत आहे मी या माणसातील
प्रवृत्तीला मारायला तू बघ....
पण त्या आधी बघू दे मला तू हे जग....
जन्म घेऊन येत आहे मी या माणसातील
अमानुषतेे चा नाश करायला तू बघ....
पण त्या आधी बघू दे तू मला हे जग....
जन्म घेऊन येत आहे मी तुझ्या अंधारलेल्या
आयुष्यात प्रकाश द्यायला तू बघ...
पण त्या आधी बघू दे तू मला हे जग...
जन्म घेऊन येत आहे मी माझ्यासारख्या
चिमुकल्यांच जगणं निर्धास्त, सुरक्षित करायला
आई तू बघ....
पण त्या आधी बघू दे तू मला हे जग....
जन्म घेऊन येत आहे मी या देशाचं भवितव्य
उज्वल करायला आई.... तू बघ...
पण त्या आधी बघू दे तू मला हे जग....
पण त्या आधी बघू दे तू मला हे जग.....
Please Save the girl child....🙏🏻
Sapna patil....✍✍✍✍
Hello....
मित्रानो मी माझ्या आयुष्यातील लिहिलेलं पहिलं प्रेमपत्र मी कस लिहिलं ते सांगते . माझ्या क्लास मधे एक दीप नावाचा मुलगा होता. तो खूप हुशार मुलगा होता क्लास मधे टॉपर होता .आम्ही दोघं पण टॉपर होते. तो मुलांमध्ये आणि मी मुलींमध्ये . दोघांचं compitationचालायचं. पण तो एक दोन मार्क ने पुढेच असायचा . मी खूप प्रयत्न करायची त्याच्या पुढे जाण्याचा पण तो मला पुढे जाऊच देत नव्हता. मी अस करायला लागले की मला खूप हसायचा.आणि मला चिडवायचे . असच हळू हळू आमच्या मधे चालू असताना कस एकमेकांच्या प्रेमात पडलो कळलच नाही. तो मला आणि मी त्याला खूप आवडायला लागलो. एकमेकांकडे पहायचो एकमेकांकडे बघून हसायचो. गावात पण तो माझ्या गल्लीतून काही काम नसताना पण यायचा . नुसता मला बघण्यासाठी. असच आमचं प्रेम वाढत गेलं . पण फक्त नजरेनं , मनाने . एकमेकांसमोर मंडलच नाही. त्याने खूप वेळा प्रयत्न केला मला सांगायचं पण त्याला वाटायचं हिला सांगितलं तर हिला वाईट वाटेल का ? ही तिच्या घरी सांगून देईल का ? यासाठी तो काहीच बोलायचं नाही. पण जे त्याच्या मनात होत तेच माझ्या पण मनात होत . मग मीच ठरवलं की याला आपणच सांगून टाकावं . मग मी त्याला पत्र लिहून द्यायचं अस ठरवलं . एक दिवस मी त्याला त्याची मराठी homeworkची वही मागितली . त्याने ती दिली . पण मला वही च काहीच काम नव्हत. मी त्याला ती वही मी लिहिलेलं प्रेम पत्र त्यात ठेऊन द्यायला मागितली होती. मग मी त्याला पत्र लिहिल . मी त्यात लिहिलं होत. Hii दीप मला तू खूप आवडतोस. आणि मी तुझ्यावर खूप जिवापाड प्रेम करते . पण तू माझ्यावर प्रेम करतो की नाही हे माहीत नाही. पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. I love you दीप . अस लिहून मी ते पत्र त्याच्या वहीत ठेऊन दिलं आणि ती वही त्याला परत केली. पण त्याने ती वही दोन दिवस पहिलीच नाही. तिसऱ्या दिवशी मराठीच्या सरांनी मराठी होमवर्क च्या वह्या चेक करायला सांगितल्या होत्या. सर वह्या चेक करायला लागले . दीप चा नंबर आला आणि दीप वही घेऊन सर कडे गेला . आणि मग जे पत्र दीप ला वाचायचं होत ते पत्र दीप ने न वाचता सरानीच वाचलं की. मग काय झाली ना फजिती राव . 😀😀 आणि पुढे काय झालं असणार ते तुम्हाला पण माहीतच आहे .सरांनी दीप ल विचारले कोणी लिहिलय हे पत्र सांग लवकर . काय झालं होत ना की मी पत्र लिहिलं पण पत्रात माझं नावच लिहायचं विसरून गेले होते. दीप काहीच न बोलता शांत खाली मान घालून उभा राहिला . पण सर दीप वर ओरडत होते ते मला खूप वाईट वाटत होत.मग मी निमुटपणे उभी राहून सरांना सांगितलं की सर मी लिहिलय ते. मग काय सर मला पण बोलायला लागले. मग सरांना पण माहिती पडून गेलं. मग आमचं प्रेम प्रकरण तिथेच थांबलं. आणि सरांनी ते माझं पहिलं प्रेमपत्र सर्वांसमोर फाडून टाकल. आणि माझ्या प्रेमाचे तुकडे केले . असच कधीपासून चाललेलं आमचं प्रेम 5 ते 10 मिनिटात संपलं. या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटल होत . आणि आम्ही तिथेच थांबलो. दिपने दुसऱ्या कॉलेजला admissionघेतलं आणि मी दुसऱ्या कॉलेजला admission घेतलं. आणि आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो.
😔😔😔
सपना पाटील.... 😊✍️
खरच सांगतेय तुला........
असले जरी मी याच्यासोबत तरी
स्वप्न तुझ्यासोबत चेच पाहिल,
या जन्मात नाही पूर्ण झाल ,
पण पुढच्या जन्मात नक्कीच होईल....
आयुष्यभर वाट पाहील तुझी
माझ्या आयुष्यात येण्याची
नको वाट तोडू माझी ,
तुझ्यासोबत चे स्वप्न बघण्याची....
कशी थांबाऊ मी माझ्या मनाला
तुझी होण्यापासून,
खरच सांगतेय तुला
अपूर्ण आहे रे माझं आयुष्य तुझ्यावाचून....
आजही तशीच आहे ही
जशी तुला हवी होती
पण खरच सांगतेय तुला
ती बदललीय आज ती
फक्त तिची मजबुरीच होती....
आज तू माझं हृदयाचे तुकडे होतील
असे तू शब्द वापरून गेलास
पण खरच सांगतेय तुला
ती जे होती ते खरच होती
त्याला तू दिखावा करते अस बोलून गेलास...
जग तू तुझ आयुष्य , मरू दे मला
जेव्हा तू अस बोलून गेलास 😢
खरच सांगतेय तुला
हे ऐकल्याने माझं काय होईल
याचा विचार तू नाही केलास.....
जे माझं खर प्रेम होत
ते तू देखव्यामधे मोजलं
पण खरच सांगतेय तुला
अजूनही तुला माझं प्रेम नाही समजल.....
पूर्ण अधिकार आहे तुला
माझ्यावर रागवण्याचा
वाटलं तर शिव्या पण दे मला
पण खरच सांगतेय
प्रेम केलय यार मी तुझ्यावर
अस सहजासहजी नाही सोडणार मी तुला......
आलास माझ्या आयुष्यात
आणि मला खूप काही शिकवलंस
जात होते मरायला आणि
तिथं पण मला तूच अडवलस......
Thank you so much
Sapna patil......✍️
मनाला बेभान करून जातं
क्षणात आस लावून जातं
नेहमी आठवण करून देतं
तुझ ते हसणं....
डोळ्यांना भाऊक करून जातं
शब्दांना ओठांवर येऊन थांबत
मनाला स्तब्ध करून जातं
तुझ ते हसणं....
हृदय धडधडायला लागतं
हृदयाला स्पर्श करून जातं
तुझं ते हसणं
श्र्वसांच गहिवरून येणं
मनाचं काहुरून जाणं
तुझं ते हसणं
गालावरच्या खडीच येणं
डोळ्यांच्या धुंदीत जाणं
मनाचं मोहरुन येणं
तुझं ते हसणं....
Sapna patil...✍✍✍
स्वतःला घडवताना आधी जीवाचे रान करावे लागते
पायात रुतला काटा म्हणून डोळ्यातील अश्रू पुसावेच लागते
समाजाच्या कठोर नजरेला टाळावे च लागते
कारण स्वतःला घडवण्यासाठी टाकीचे घाव सोसावेच लागते
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी झुंजावे च लागते
स्वतःला घडवताना तळपत्या उन्हात तडपावे च लागते
रखरखत्या रानात जळून कष्टाच्या घामात झिजावे च लागते
स्वतःला घडवण्यासाठी आपण केलेल्या संघर्षाची जान ठेवावीच लागते
स्वतःला घडवण्यासाठी समाजाकडे दुर्लक्ष करावेच लागते
आयुष्य खूप कठीण आहे ते जगण्यासाठी आधी स्वतःला घडवावेच लागते
जगात कुणीच कुणाच साठी नाहीय हे मान्य करावेच लागते
म्हणून स्वतःला घडवण्यासाठी स्वतःलाच कष्ट घ्यावेच लागते
आयुष्यात खूप दुःख सोसावे लागते
पण आपण रडत न बसता आनंदाने आयुष्य हे जगावेच लागते
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ठेच ही लागेलच
ठेच लागल्यावर वेदना ह्या होतीलच पण
त्या वेदनांना सुद्धा आनंदात स्वीकारावेच लागते
म्हणून स्वतःला घडवताना जीवाचे रान करावेच लागते....
म्हणून सांगते आयुष्य खूप सुंदर आहे
ते सुंदर जगण्यासाठी आधी स्वतःला घडवावे च लागते....
😊😊😊
वाट पाहतोय मी त्या येणाऱ्या पावसाची
मी पेरलेल बीज उगवण्याची
वाट पाहतोय मी त्या बीजाला अंकुर फुटण्याची
वाट पाहतोय मी त्या अंकुराच सोनं होण्याची
वाट पाहतोय मी , मी केलेल्या कष्टाच्या फळाला भाव मिळण्याची
वाट पाहतोय मी कर्जमुक्त होण्याची
वाट पाहतोय मी माझ्या मुलांचे स्वप्न साकार करण्याची
वाट पाहतोय मी,
त्या तळपत्या उन्हात काम केलेल्या कामाला न्याय मिळण्याची
वाट पाहतोय मी माझ्या डोक्यावरचं ओझ कमी होण्याची
वाट पाहतोय मी माझं आयुष्य सुखात जगण्याची
Sapna patil...✍️✍️
कधी उमलशिल माझ्या आयुष्यात तू....
कधी बहरशिल माझं आयुष्य तू....
कधी समावशिल ग माझ्यामध्ये तू....
वाट बघतेय ग तुझी आतुरतेने....
ये ना परत माझ्या आयुष्यात तू.....
😔😔
Sapna patil.....✍️✍️✍️✍️
नको उघडू ते दार दुःखाचे
अथांग सागरत वाहू दे झरे सुखाचे
त्या झऱ्याना मनसोक्त वाहू दे
त्यांना पण ते स्वतंत्र जीवन जगू दे
घेऊन येतील ते झरे कधी शंकू तर कधी शिंपले
त्यातील माणिक मोत्यांचे खान कधी न संपले
सागराच्या तळाशी जाऊन हिरे मोती आणतात ते
त्या सागरातील पाण्याच्या थेंब सारखेच निर्मळ असतात ते
नको उघडू ते दार दुःखाचे
घेऊ दे त्यांना पण ते क्षण सुखाचे....
Sapna patil.....✍️✍️✍️
गेले होते रानात फिरायला
तिथं मला तहान खूप लागली होती
पाणी नव्हते तिथं
घरी जाण्याची आस खूप लागली होती
घरी जायला वेळ खूप होता
मला लागलेली तहान कशी भागवू
हाच विचार मनात होता
वाट खूप मोठ्ठी होती
घरी पोहचेल की नाही
मनात भीती खूप होती
तहान लागल्यामुळे
घसा कोरडा झाला होता
आता काही खर नाही
या भीतीने जीव कासावीस झाला होता
छोट्याशा वाटेतून चालताना
समोर खूप मोठी खोल
दरी लागली होती
त्या खोल दरीला बघून
नजर माझी फाकली होती
पाय घासरून दरीत
मी कोसळली
आणि तिथच माझ्या
जीवाची लाही लाही झाली
माझा शेवटचा श्वास मी तिथं
खोल दरीत सोडला होता.
माझी तहान भागवायला
तिथं माझा काळ आला होता
शेवटची एकदाची
भागली माझी तहान
तेव्हा माझ्या काळाने
कार्य केले महान
अशी माझ्या आयुष्याची
शेवट बनली माझी तहान....
Sapna patil....✍️✍️✍️✍️
खूप आठवतात ते शाळेचे दिवस
अभ्यासाचा असायचा खूप आळस
सर सांगायचे homework
पूर्ण करून आणायचा
आम्ही मुलांना सांगायचो
अभ्यासाचा load नाही घ्यायचा...
अभ्यास करताना खूप मारायचो गप्पा
मग अभ्यास पूर्ण नाही झाला की
सरांच्या हातच्या मस्त खायचो थापा
खूप वेळा पडायची
खो - खो, कबड्डी खेळताना
मग मुलं मला खूप हसायचे
सरांच शिकवण चालू असताना
🤗🤗😄
खूप आठवतात ते शाळेचे दिवस
Sapna patil ✍️✍️✍️
त्या दिवशी माहेरी गेली असताना माझी गाडी माझ्या मराठी शाळेजवळ थांबली. गाडीच टायर पंक्चर झाल होत. मी गाडीतून खाली उतरली आणि माझं लक्ष शाळेतील माझ्या वर्गाकडे गेलं. त्या वर्गाला पाहता क्षणी मी माझ्या भूतकाळात गेले. ते लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. शाळेत जे घडलेलं होत ते चित्र सगळ जशेच्या तसच डोळ्यासमोर आलं. शाळेत बसलेली सर्व आम्ही मुलं मुली, एका बाजूला खिचडी शिजवत असताना त्या बाई, ती खो - खो ,कबड्डी खेळणारी मुलं सगळ सगळ आठवलं. एकदा सरांनी आम्हाला मातीच्या वस्तू बनवून सांगितल्या होत्या. मग कुणी सीताफळ कुणी मिरची , वांगी अशा वस्तू बनवून आणल्या होत्या. त्यांना त्याच वस्तूचे रंग देऊन खूप सुंदर सजवले होते. पण वर्गातील काही मुलांनी आमच्या वस्तू तोडून टाकल्या होत्या . आणि मग काय त्या मुलांशी एवढं जोरात भांडण केलं होत राव की सांगूच नाही शकत. 😄😄 मस्त मज्जा आली होती त्यांची. सरांना पण सांगितलं होत त्यांचं नाव . मग सरांनी त्यांना कण पकडून घोडा बनवायला लावलं होतं. आम्हा मुलींना खूप भारी हसायला आलं होत. 🤗🤗 खूप आठवतात ते शाळेचे दिवस. पण त्यांना तेव्हा sorry च mhnaych राहून गेलं.वर्गामध्ये मी पहिल्याच बेंच वर बसायची. मग काय वर्गात सर्वांसोबत leader सारखी वागायची. मुलं पण एक आवाजात शांत बसायचे. ते रोजच सारंच शिकवण, दुपारच्या सुट्टीत बाहेर एका रांगेत खिचडी खायला बसणं, मग ground वरती खेळायला जान, खूप आठवलं. सर वर्गात शिकवायला येत नाही तोपर्यंत एकमेकांच्या खूप खोड्या करायचो आम्ही. मग सर यायचे वर्गात आणि सर्वात पहिले homework check करायचे. पण एकाचा पण homework complete नसायचा. मग काय एका रांगेन सर सर्व मुलांना खूप मारायचे. मग काय सांगता दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे homework direct complete. खूप हसायला पण यायचं. आमच्या वर्गात एक दिपाली नावाची मुलगी होती आणि उमेश नावाचा एक मुलगा होता. ते दोघं पण एकमेकांना खूप like करायचे. वर्गात सर शिकवत असताना पण ते एकमेकांना चोरून बघायचे. दिपलीला उमेश खूप आवडायचा. एकदा काय झालं ना आमच्याच वर्गातील एका मुलीने उमेशला पेन मागितला . आणि ते दिपालीला दिसल. मग काय सांगता ना राव झाली ना सुरू दोघींची भांडण . एकमेकींना खूप शिव्या पण दिल्या एकमेकींच्या वेण्या पण ओढल्या. 🤣🤣🤣😃😃😃
खूप भारी हसायला आलं होत मला तर . खूप आठवतात ते शाळेचे दिवस अजूनही. अस वाटल परत आपण लहान व्हावं आणि शाळेत जावं. खूप सुंदर आठवणी आहेत लहानपणच्या . असेच असतात प्रत्येेकाच्या आयुष्यातील शाळेचे दिवस....🤗🤗😊
Sapna patil ✍️✍️✍️
आज शाळेतील तो
एक दिवस आठवला
ज्या दिवशी माझा
board ला पहिला नंबर आला
सरांनी मला फुल गुच्छ देऊन
अभिनंदन केलं
तेव्हा माझ्या बाबांचं
मन भरून आलं
माझी मुलगी board ला पहिली आली
अस त्यांचं मन बोलू लागलं...
बाबांच्या डोळ्यातील पाणी बघून
माझ्या मनात शिकण्याची
अजुनच उमेद निर्माण झाली
सर बाबांना सांगू लागले
तुमच्या मुलीला खूप शिकवा
त्यांनी मला शिकवले...
म्हणून मी आज सक्षम झाली
.......sapna patil....✍️✍️
माझ्या आजोळी च प्रेम वेगळच असायचं
तिच्याशी बोलताना नेहमी चेहऱ्यावर हास्य असायचं...😊
आमची आजोळी खूप कॉमेडि करायची
तिला मी नेहमी डायलॉग बुढ्ढी म्हणायची..😜🤗😄
आमच्या आजोळीची तर गोष्टच न्यारी
सर्वांना आवडायची ती खूपच भारी...👌😘
सुट्या लागल्या की मी आजोळी कडे जायची
तेव्हा आमची आजोळी मला तीच प्रेम खूप द्यायची😘💞
माझी आजोळी मला कडुलिंबाचा झाडाखाली झोपवयची
आणि मला चतुर अकबराच्या छान छान गोष्टी सांगायची..🤗
माझ्या आजोळी च्या बोलण्यात होता खूपच गोडवा...
माझ्या आजोळी चा स्वभाव होता खूपच हळवा...😘😘
Sapna patil......✍️✍️✍️
मला पण खूप वाटत
तुझ्या सोबत राहावं...
खूप वाटत की तुझ्याच
सोबत लग्न करावं...
खूप वाटत मला माझ्या
आयुष्याची स्वप्न तुझ्यासोबत
रंगत करावं..
वाटत मला पण माझा
हात नेहमी तुझ्या हातात असावा
खूप वाटत मला की तुझी
नवीन आयुष्याची सुरुवात
माझ्यापासुन व्हावी.
वाटत मला पण की तुझ्या
प्रत्येक सुख दुःखात मी
तुझ्या सोबत असावं
खूप वाटत मला की मी तुझी
आयुष्यभर राणी बनून राहावं...
वाटत मला पण तुला
फक्त माझ्याच कुशीत घ्यावं...
खूप वाटत मला की
तुझ्यावर फक्त मीच प्रेम करावं...
तुझ्यावर फक्त आणि फक्त
माझाच अधिकार असावा...
खूप वाटते मला की मी माझं
पूर्ण आयुष्य फक्त
तुझ्या साठीच जगावं...
वाटत मला पण की तुला
आयुष्यभर फक्त मीच सावराव...
खूप वाटत मला की आपल्या
आयुष्यात कितीही संकट
आले तरी त्यांना आपण
दोघांनी मिळून समोर जावं..
वाटत मला पण आपल्या
आयुष्याचं चक्र आपल्याच
हातात असावं...
खूप वाटत मला की तुझी
सकाळ पण माझ्या सोबतच व्हावी....
आणि रात्र पण माझ्यासोबत च संपावी...
खूप वाटत मला की मी फक्त
आणि फक्त तुझ्याच साठी जगावं...
वाटत मला पण की फक्त
तूच माझा शेवट आणि
मीच तुझा शेवट असावं...
खूप वाटत रे मला की हा
माझा श्वास पण फक्त
तुझ्याचसाठी असावा...
खूप वाटत मला की तुझ्या
डोळ्यात फक्त मीच राहावं...
वाटत मला पण की तुला मी
फक्त माझ्यातच सामावून घ्याव...
आणि आयुष्यभर तुझ्या असच सोबत राहावं...
खूप वाटत मला की तुझ्या
आयुष्याची सुरुवात ही मीच व्हावं...
आणि शेवटही मीच व्हावं...
Sapna patil~~~~✍️✍️✍️
घरापासून दूर जाताना
खूप वाईट वाटते
राहिलेल्या आठवणी सोबत
असताना फक्त पाणीच
डोळ्यामध्ये दाटते
घरापासून दूर जाताना
मन माझं भरून येते
प्रश्न असतो पोटाचा घर सोडून
कुठ तरी बाहेर जावच लागते
प्रश्न असतो त्या आयुष्याचा
आयुष्याला आकार देण्याचा
त्याला आकार देण्यासाठी
घरापासून दूर जावं लागतं
घरापासून दूर जाताना फक्त
आठवणी सोबत घेऊन जाते
इथं कोणीच नाहीय आपल
फक्त हेच मनात राहून जाते
आणि कोण आपलं आणि कोण
परक याची जाणीव होऊन जाते....
घरापासून दूर जाताना मनाची
खूप तयारी करावी लागते
मनी आलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी
घापासून दूर जावं च लागते....
Sapna patil....✍️
तू पहाट होऊन आलास
आयुष्यात माझ्या
मी तुझ प्रेम होऊन
गेली आयुष्यात तुझ्या
तू रात्र होऊन आलास
आयुष्यात माझ्या
मी एक स्वप्न होऊन
गेली आयुष्यात तुझ्या
तू किरण होऊन आलास
आयुष्यात माझ्या
मी एक आंधरलेली रात्र होऊन
गेली आयुष्यात तुझ्या
तू तो बहरलेला निसर्ग होऊन आलास
आयुष्यात माझ्या
मी ते कोमेजलेल्या झाडाचं सुकलेल
पान होऊन गेली आयुष्यात तुझ्या
तू तर खरच खूपच सुंदर प्रेम
निभावून गेलास आयुष्यात माझ्या
मी तर खरच काळोख करून गेली रे
आयुष्यात तुझ्या...
😔😔😔😔
Sapna patil....✍️✍️✍️
मला यायचं आहे तुझ्यासोबत
मला जगायचंय तुझ्यासोबत
मला श्वास घ्यायचंय तुझ्यासोबत
मला माझ्या आयुष्याची वाट
बघायची y तुझ्यासोबत
स्वप्न पण पाहिलं मी तुझ्यासोबत
पण.............
😔😔😔😔
हे माझं आयुष्य खेळ खेळत आहे माझ्यासोबत
काय करू यार हे काय होतंय माझ्यासोबत
मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय
पण......
हे माझं नशीब नाही राहू देत तुझ्यासोबत
पण....
मला मारायचं पण आहे तुझ्याच सोबत...😔
Sapna patil.....✍✍✍✍✍
प्रेम केले रे मी फक्त
नाही केला मी कोणता गुन्हा
खूप वाट बघतेय तुझी
ये ना परत माझ्या आयुष्यात पुन्हा
काय पाप केलय मी की
तू देतोय मला एवढी मोठ्ठी शिक्षा
तू फक्त माझ्या सोबत रहा
याच माझ्या प्रेमाची मी
तुझ्यासमोर मागतेय भिक्षा....🙏
मी केलेल्या कर्माच
फळ मला मिळतंय
राहिलेल्या तुझ्याच
आठवणीत
मन माझं जळतयं....
तुझ्यावर प्रेम केलं
ही आहे का रे माझी चूक
बोल ना रे एकदा माझ्याशी
लागलीय मला तुझ्या त्या
प्रेमळ शब्दांची भूक.....
का सतावत आहे तू मला
का घेतोय तू माझी परीक्षा
तुझ्या प्रेमा व्यतिरिक्त तुझ्याकडून
काहीच नव्हती रे मला अपेक्षा.....
तू बोललेला एक एक शब्द
माझ्या कानात गुंजत आहे
खरच सांगतेय तुला
तुझी आठवण खूप येत आहे....
प्रेमच केलं मी फक्त
तुझ्यावर नाही केलं कोणतं पाप
कोणत्याच गोष्टीची
नाही देणार कधी तुझ्या मनाला धाप.....
नाही केला रे यार
मी कोणता गुन्हा
खूप वाट बघतेय तुझी
ये ना परत माझ्या आयुष्यात पुन्हा...
Sapna patil.....✍️
सवय झालीय तुझी
ती कधीच जाणार नाही
लाख प्रयत्न करेल
तुला विसरण्याचा पण
ती सवय कधीच
मोडणार नाही
सवय झालीय तुझ्या
प्रेमळ शब्दांची
ती कधीच जाणार नाही
नेहमी आठवणीत
राहशील तू माझ्या
त्या आठवणीला
कधीच मोडणार नाही
Sapna patil....✍✍✍
अनोळखी होतास तू मला आणि मी तुला
केव्हा ओळखीचे झालो कळलेच नाही मला
अनोळखी नंबर वरून एक कविता आली मला
अनोळखी होतास तर माझा तुझ्या जवळ नंबर कसा रे आला
असच बोलता बोलता तू ओळखीचा झालास
मग एक दिवस तू मला तुझा फोटो पाठवला
मग काय तू तर माझ्या जवळचाच निघाला😜😃😃
ओळखीचा असताना ही अनोळखी सारखा वागला
पण एक दिवस माझाच होऊन जाशील अस वाटल नव्हत मला...
Sapna patil.....✍✍✍✍
नाही वाटत मला दुःख
या अकाली मृत्यूच
दुःख वाटत ते तुझ्या नशिबी
आलेल्या एकाकी पणाच
दुःख वाटत ते तुझ्या डोळ्यातून
उडून गेलेल्या तेजाच
नाही थांबवू शकत तुझ्या
डोळ्यातून वाहणाऱ्या
अश्रूंचे पाट मी आता
कारण तुझ्या आयुष्यातील
माझ्या असण्याच अस्तित्व
आता फक्त एक भूत गाथा
नाही राहील आपल कुणी
नाही ठेवायची कुणाची आशा
आपण एकटेच आहोत
हीच आपल्या कर्माची पाशा....
Sapna patil....✍️
कह तो दिया आपने हमको बेवफा
आपको हमारी वफा समझमें ही नहीं आई....
लेकीन हमारे ही नसिब की डोर ही ऐसि हैं जनाब
की वो किसी की तकदिर बनकर ही नहीं आई.....
पेहले प्र्यार कों तो हमने ही
मजाक समझ कर मार डाला....
लेकीन आपसे तो हमने सच्चा
प्यार किया उसें तो आपने
ही बेवफा कर डाला....
सोचा था जिंदगी मे दुबारा कभी
किसिसे प्यार नाही करेंगे
ऐसी कसम हमने खाई थी....
लेकीन क्या करे दुबारा
हमे प्यार हो गया
ऊस वक्त मुझ पर
मेरे रब की दुवा थी....
जब याद आती है आपकी
तब आखो मे आसू अा जाते हैं....
आप जहा भी रहे खुश रहे
यही हम रब से दुआ करते हैं.....
आपके हैं... आपके ही रहेंगे....
Sapna patil ✍️
एक मागू तुझ्याकडे शेवटचं
खूप मदत केलीस तू माझी
पण शेवटची एक मदत करशील तू माझी
बघ ना किती प्रयत्न केले
तुला विसरण्यासाठी
पण तू नाही जात आहेस या मनातून
बघ ना तुला मनातून काढण्यासाठी
किती प्रयत्न केले
रडता रडता या डोळ्यातील
अश्रूच संपून गेले
बघ ना तुला माझ्या तून आता
दूर पण केलं जातं नाहीय
बघ ना आता सहज हे जग
सोडून पण जाता येत नाहीय
आता तू नाही, तुझ्या आठवणी
सोबत भांडायचे आहे
आता या श्वसाला पण अजून
जगायचं नाही आहे
तरी शेवटची एक मदत
तू मला करून जा
ऐक ना रे....
सांग ना एकदा मला प्रेमाने
तू माझ्या आयुष्यातून निघून
तिकडेच मरून जा
तिकडेच मरून जा.....😢😢
तुझा तो शेवटचा msg माझ्या
काळजाचे तुकडे करून गेला
निघून जा माझ्या आयुष्यातून
असे शब्द तू बोलून गेलास
तुझा तो शेवटचा msg माझं
आयुष्य घेऊन गेला
जा कायमच विसरून जा मला
असे बोल तू बोलून गेलास
तुझ्या त्या शेवटच्या msg ने
माझा जीव अर्धमेला झाला
तो msg तर माझं माझ्यापासुन
आयुष्यच हिरावून गेला...
तुझा तो शेवटचा msg
खुप त्रास देऊन जातो रे मला
तू तर माझ्या खऱ्या प्रेमाला पण
Time pass बोलून गेलास....
तुझा तो शेवटचा msg
खुप त्रासदायक होता
तो msg तर आपला खरच
शेवटच बनून गेला....
Sapna patil....✍️
तो दृष्टीस कधी दिसेना
तर तो चित्ती माझ्या येई
चित्ती माझ्या येऊनी मन
माझे चलबिचल करुनी जाई
मज चलबिचल करुनी
माझ्या भावनांची चौफेर होई
तरी मज दृष्टीस कधी तो दिसेना
तू दीसतास कधी मज
भावनाची मैफिल चौफेर होई
ते सूर्य चंद्र तारे नभात चमकावी
तरी तो दिसताच मन माझे
चलबिचल होई
शब्द माझेे होऊनी ओठी
कधी तो माझ्या येई
तो चित्ती येऊनी माझ्या
वाऱ्याची झुळूक तो होई
तो जानवताच मन माझे
चलबिचल होई
तो येताच दृष्टीस माझ्या
भावनांची मैफिल चौफेर होई....
Sapna patil ✍️
किती सत्व घेशील रे निसर्गा
काय मिळते रे घेऊन
तुला आमची मजा
उन्हा तन्हात राबराब
राबतो य माझा शेतकरी राजा....
तोंडी आलेला घास तू
हिरावून नको घेऊस
कशाला पडतो रे तू
भलत्या वेळेस पाऊस.....
अख्ख्या जागाच पोट मी भरतोय
या इवल्याश्या अंकुराने
नको त्याच पुढचं ताट तू ओढुस
भलत्या वेळच्या पावसाने.....
मीच नसला तर हे
जग काय खाईल
त्यांना नाही मिळालं अन्न
तर हे जग मरून जाईल.....
खूप मोठ्ठं कर्ज आहे रे
माझ्या डोक्यावर
मुलाबाळांची स्वप्न पूर्ण करण्याचं
ओझ आहे माझ्या खांद्यावर.....
बीजाचे अंकुर करतो
अंकुरााचे फुल बनवतो
फुलाचे फळ मी करतो
आणि तोंडाशी आलेला
घास माझा तू का रे ओढतो....
हे निसर्गा नको रे घेऊ
माझी ही सत्वपरीक्षा
मी उगवलेल्या अंकुरच
पीक येऊ दे हीच होती रे
तुझ्याकडून अपेक्षा....
नको आणू ती माझ्यावर
आत्महत्येची पाळी
एवढं मोठ्ठं कर्जाच ओझ
नको लिहू माझ्या भाळी....
होऊ दे मला कर्जमुक्त
दे तू माझ्या पिकाला भाव
तेव्हाच पडेल माझ्या
लेकरांवर छाव...
काळया मातीत सोन मीच उगवतो
अख्ख्या जगाचं पोट मीच भरतो
आणि फाटलेली गंजी सुद्धा मीच घालतो
मग तू मलाच का हा दिवस दाखवतो....
सांग निसर्ग सांग
आज मी तुला प्रश्न विचारतोय
हे नालायक सरकार आज
मलाच का फसवतोय.....
Sapna patil....
विसरून भान सारे
मी तुझ्यात गुंतले
तुझ्या डोळ्यातील तेज
पाहून भान माझे हरले....
तुझ्या नजरेला
नजर भिडताच
मी माझेच न राहिले.....
तुझ्या त्या नशिली डोळ्यांनी
भान माझे हरपले.....
तुझ्या एका शब्दाला
मी ऐकताच
मन माझे तुझ्यात
हरवून गेले....
तुझ्या त्या गोड
शब्दाने मनाला
स्पर्श होताच भान
माझे हरवून गेले....
विसरून भान माझे
सारे मी तुझ्यात गुंतले....
Sapna patil....✍️✍️✍️
असे हे मला काय होते...🤔
तू माझ्याशी बोलायला लागला....😘
की मी hang पडून जाते....🤩
असे हे मला काय होते....🤔
असे हे मला काय होते...
तू स्वप्नात जरी आलास माझ्या
तरी माझं हृदय धडधडू लागते...
कळत नाही रे
हे असे मला काय होते....
असे हे मला काय होते
तुझ नाव जरी ऐकल ना
तर माझा आनंद गगनात
मावेनासा होतो....
कळत नाही रे
असे हे मला काय होते....
असे हे मला काय होते
नुसत्या तुझ्या विचाराने
मन माझे डोलायला लागते
असे हे मला काय होते.....
तू एक दिवस जरी माझ्याशी
बोलला नाही ना तर मन माझं
कावराबावरा होऊन जाते
कळत नाही रे
हे असं मला काय होते....
तुझ्या सकाळच्या एका msg
ने माझा दिवस पूर्ण होऊन जातो
कळत नाही रे मला... तूच सांग ना...
असे हे मला काय होते...
Sapna patil....✍✍✍✍✍
सांगायचं नव्हत तुला... पण
तुला संगल्याविना राहवेना....
सगळ्यांसोबत असूनही
एकटी आहे तुझ्याविना...
सांगायचं नव्हत तुला....पण
मनातल गुपित सांगुनच टाकते...
तुझे पाणीदार डोळे आहेत ना
ज्यात बघितलं की सगळ काही
थांबल्यासारख वाटते...
सांगायचं नव्हत तुला...काही
पण तुला सांगावस वाटलं...
तुझ्या निरागस हसण्यानेच
मला दुःखात हसायला शिकवलं....
सांगायचं नव्हत तुला....
प्रेम केलं मी तुझ्या
त्या आठवणींवर...
ज्या आजही स्वप्न होऊन
आहेत माझ्या मनावर....
Sapna patil....✍️✍️✍️
धुंद हा गारवा....
मनी माझ्या भावला
सायंकाळ झाली असता
नभात विरघळला...
चांद रात्रीला तू
स्पर्श करून गेला
तुझ्या स्पर्शाने चांद
रात्रीत ही मोगरा फुलला...
धुंद हा गारवा...
मज बेधुंद करुनी गेला....
साज ह्यो तुझा
घायाळ मज करुनी गेला...
मज वेड लावुनी गेला
धुंद हा गारवा....
तुझ्यात हरवून सांजवेळी
खेळ स्वप्नांचा पहावा....
ओढ तुझी लावी या जीवा
धुंद हा गारवा....
चंद्राच्या शितलतेत मला
निरखून पहावा.....
Sapna patil ✍️✍️✍️
तू ही शांत मी निवांत
शांत आहेत त्या चांदण्या
भाव माझे बोलले
हर्ष मनी खूप झाला
मन मिलन होताना
वेचल्या मी कविता
चांदण्यात फिरताना....
चंद्र तारे,नभ आणि
सोबत ती थंडगार हवा
अंगाला झोंबून गेले
या गारव्यात मी
स्वप्नात बुडून गेले
गालातच हसू फुलले
स्वप्नभंग ही होताना
वेचल्या मी कविता
चांदण्यात फिरताना....
स्वप्न एक मी पाहिले
तू सोबत असताना
नकळत तू वेढलास
नजरा नजर होताना
वेचल्या मी कविता
चांदण्यात फिरताना....
Sapna patil.....✍️✍️✍️✍️
मी माझी न राहिले
मदमस्त होऊन तुझ्यात
मी सामावून गेले....
या गोड क्षणापेक्षा
आणखी सुख कोणते असावे
या बेभान क्षणी मी
स्वतःला हरवून बसावे....
या बेभान क्षणी मी
स्वतःला तुझ्यात गुंतवले....
नात अस जोडले मी तुझ्याशी
की माझे मी मलाच हरवले....
Sapna patil....✍️✍️✍️
पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...