विसरून भान सारे
मी तुझ्यात गुंतले
तुझ्या डोळ्यातील तेज
पाहून भान माझे हरले....
तुझ्या नजरेला
नजर भिडताच
मी माझेच न राहिले.....
तुझ्या त्या नशिली डोळ्यांनी
भान माझे हरपले.....
तुझ्या एका शब्दाला
मी ऐकताच
मन माझे तुझ्यात
हरवून गेले....
तुझ्या त्या गोड
शब्दाने मनाला
स्पर्श होताच भान
माझे हरवून गेले....
विसरून भान माझे
सारे मी तुझ्यात गुंतले....
Sapna patil....✍️✍️✍️
No comments:
Post a Comment