Thursday, August 8, 2024

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे
वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे
नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे
सुखाचे झरे ही आयुष्यात तुमच्या अविरत वहावे
रक्षण तुमचे नेहमीच आईसाहेब मुक्ताईने करावे
डगमगू नये कधीच पुढे टाकणारे ते पाऊल 
कधीही न संपावी सुखाची शिदोरी
रत्नजडित खानानी आयुष्य तुमचे भरभरून यावे
सरसर अलगद वाहून जाव्या त्या दुःख मय वेदना
रडगाणे ते आयुष्याचे क्षणात हरवून जावे.....

sapna patil...✍🏻

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.... 🎂🎊🎊
💐💐
8/8/2026
पणती पेटावी जशी वात त्या दिव्यातली
वसा चालवुनी संस्काराचा 
नदीकिनारी फिरक्या घेती लाटा 
सुखाचा प्रवास तो आनंदाचा
रक्षावे तुम्हासी विनंती स्वामी नारायणा 
डगमगाव्या न कधी तुमच्या पाऊलखुणा
कर जोडूनी दोन्ही वाहती देवा समोर फुले
रममाण होऊनी आयुष्यात आनंद पसरे चहुकडे ...
सर्वदा सुखी रहावे आपले जीवन
रक्षणकर्ता परमेश्वर सुखी ठेवो तुम्हाला पवन 


परिसस्पर्श सद्विचारांचा तुम्हास घडावा 
वचन सात जन्माचे सोबत असावे
न कधी मागे परत वळूनी पहावे 

No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी