Showing posts with label तुझ्यात जीव गुंतला. Show all posts
Showing posts with label तुझ्यात जीव गुंतला. Show all posts

Monday, October 31, 2022

तुझ्यात जीव गुंतला

किती रे तुझी आठवण 
मला खूप सतावत आहे
या भिजलेल्या मनाला 
अजूनच भिजवत आहे
वेडापिसा झालाय जीव माझा
तो तुझ्यातच गुंतत आहे
कशी सावरू त्याला
त्याचा तर बांधच फुटत आहे
ओलेचिंब डोळे माझे
संकेत ते देत आहे
या भिजलेल्या मनाला
अजूनच ते भिजवत आहे


खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी