Showing posts with label माझी लेखणी. Show all posts
Showing posts with label माझी लेखणी. Show all posts

Tuesday, November 8, 2022

माझी लेखणी

आज उतरावं तू लेखणीत माझ्या
अन् सामावून जावं मनअंतरी माझ्या
कोरावं मी तुला या कोऱ्या कागदावर
अन् तू बघत राहावं डोळ्यात माझ्या

आज बेधुंद व्हावं लेखणीने ही माझ्या
अन् उधळून टाकावं स्वतःला हृदयी माझ्या
लिहावं मी तुला त्या पिंपळाच्या पानावर
अन् तू न्याहाळत राहावं स्पंदनांना  माझ्या

आज बेभान व्हावं लेखणीने ही माझ्या
अन् बरसून टाकावं स्वतःला काळजावर माझ्या
मांडावं मी तुला या फुलांच्या पाकळीवर
अन् तू निरखून पाहावं गुलाबी ओठांना माझ्या

आज वाहून जावं लेखणीने ही माझ्या
अन् आभाळासारखं दाटून यावं मनात माझ्या
सावरावं मी तुला या माझ्या तळ हातावर
अन् तू निभवावं  ते नातं आपलं आयुष्यावर माझ्या


खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी