अन् सामावून जावं मनअंतरी माझ्या
कोरावं मी तुला या कोऱ्या कागदावर
अन् तू बघत राहावं डोळ्यात माझ्या
आज बेधुंद व्हावं लेखणीने ही माझ्या
अन् उधळून टाकावं स्वतःला हृदयी माझ्या
लिहावं मी तुला त्या पिंपळाच्या पानावर
अन् तू न्याहाळत राहावं स्पंदनांना माझ्या
आज बेभान व्हावं लेखणीने ही माझ्या
अन् बरसून टाकावं स्वतःला काळजावर माझ्या
मांडावं मी तुला या फुलांच्या पाकळीवर
अन् तू निरखून पाहावं गुलाबी ओठांना माझ्या
आज वाहून जावं लेखणीने ही माझ्या
अन् आभाळासारखं दाटून यावं मनात माझ्या
सावरावं मी तुला या माझ्या तळ हातावर
अन् तू निभवावं ते नातं आपलं आयुष्यावर माझ्या
No comments:
Post a Comment