Showing posts with label पुन्हा एकदा भेटशील ना. Show all posts
Showing posts with label पुन्हा एकदा भेटशील ना. Show all posts

Saturday, October 8, 2022

पुन्हा एकदा भेटशील ना

पुन्हा नव्याने जगू आपण 
एकदा पुन्हा भेटशील ना

उभं आयुष्य करेल मी तुझ्यासाठी अर्पण
आयुष्यभर साथ देण्यासठी 
एकदा पुन्हा मला भेटशील ना

येतील रस्ते काटेरी आयुष्यात आपल्या
करेल मी संघर्ष तुझ्यासोबत जगण्यासाठी
म्हणून पुन्हा एकदा मला भेटशील ना

जशी फुले ओंजळीत अलगद ठेवावी
तसचं आयुष्यभर जपेल तुला
पण आयुष्यात पुन्हा एकदा मला भेटशील ना

जगण्यासाठी तुझी साथ हवी आहे मला
पडलेच मी खाली आयुष्यात कधी 
माझा हात धरण्यासाठी पुन्हा एकदा मला भेटशील ना

जपेल मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासपर्यंत तुला
तूही मला सावरण्यासाठी आयुष्यात माझ्या
पुन्हा एकदा मला मिठीत तुझ्या घेशील ना
आयुष्यभर साथ देण्यासाठी पुन्हा एकदा भेटशील ना....


खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी