एकदा पुन्हा भेटशील ना
उभं आयुष्य करेल मी तुझ्यासाठी अर्पण
आयुष्यभर साथ देण्यासठी
एकदा पुन्हा मला भेटशील ना
येतील रस्ते काटेरी आयुष्यात आपल्या
करेल मी संघर्ष तुझ्यासोबत जगण्यासाठी
म्हणून पुन्हा एकदा मला भेटशील ना
जशी फुले ओंजळीत अलगद ठेवावी
तसचं आयुष्यभर जपेल तुला
पण आयुष्यात पुन्हा एकदा मला भेटशील ना
जगण्यासाठी तुझी साथ हवी आहे मला
पडलेच मी खाली आयुष्यात कधी
माझा हात धरण्यासाठी पुन्हा एकदा मला भेटशील ना
जपेल मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासपर्यंत तुला
तूही मला सावरण्यासाठी आयुष्यात माझ्या
पुन्हा एकदा मला मिठीत तुझ्या घेशील ना
आयुष्यभर साथ देण्यासाठी पुन्हा एकदा भेटशील ना....
No comments:
Post a Comment