तूच आहेस भाग्यविधाता
तूच आहे करता करविता
क्षणोक्षणी सोबत तू असावा
कधीच देवा तुझा विसर न व्हावा
नमन करिते गुरू माऊलीला
भूल न कधी पडो या पामराला
असते तुझ्या समर्था मनात रे आस
तुझा विसर ना पडो जोपर्यंत माझा श्वास
कधी भुलले देवा तूज आठवण करून दे
वंदन करते तुला पदरात तुझ्या या लेकरास घे
No comments:
Post a Comment