Showing posts with label तुझ्या msg ची वाट बघताना. Show all posts
Showing posts with label तुझ्या msg ची वाट बघताना. Show all posts

Tuesday, October 5, 2021

तुझ्या msg ची वाट बघताना

 आतुरता लागते मनाला खूप 

तुझ्या मेसेज ची वाट बघताना 

आठवण येते तुझी खूप 

तुझे जुने मेसेज परत वाचताना

आज येईल उद्या येईल तुझा मेसेज 

दिवसा मागे दिवस निघून जाताना

खूप आठवण येते तुझी 

तुझे जुने मेसेज परत वाचताना

आठवशील मलाही तू कदाचित

तू पावसात भिजताना

एवढी पण वाईट नाहीय मी 

की तू लगेच विसरून जाशील 

तू दुसरी कुणासोबत असताना

करशील तू ही एक दिवस मला मेसेज

तुझ्या स्वप्नात मी फिरताना

एवढी आठवेल मी तुला की 

तुला परत ओढ लागेल माझी 

तू तिच्यासोबत तो गोड क्षण जगताना....

पण मला खूप आठवण येते तुझी 

तुझे परत तेच जुने मेसेज वाचताना.....


Sapna patil.....✍️



खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी