आतुरता लागते मनाला खूप
तुझ्या मेसेज ची वाट बघताना
आठवण येते तुझी खूप
तुझे जुने मेसेज परत वाचताना
आज येईल उद्या येईल तुझा मेसेज
दिवसा मागे दिवस निघून जाताना
खूप आठवण येते तुझी
तुझे जुने मेसेज परत वाचताना
आठवशील मलाही तू कदाचित
तू पावसात भिजताना
एवढी पण वाईट नाहीय मी
की तू लगेच विसरून जाशील
तू दुसरी कुणासोबत असताना
करशील तू ही एक दिवस मला मेसेज
तुझ्या स्वप्नात मी फिरताना
एवढी आठवेल मी तुला की
तुला परत ओढ लागेल माझी
तू तिच्यासोबत तो गोड क्षण जगताना....
पण मला खूप आठवण येते तुझी
तुझे परत तेच जुने मेसेज वाचताना.....
Sapna patil.....✍️
No comments:
Post a Comment