काय लिहावे मन भरून आलंय आज... आज मी माझ्या माहेरी गेलेली असताना मला माझी जि. प. मराठी शाळा दिसली आणि शाळेसमोरून जाताना मी यांना गाडी तिथच थांबवायला लावली. आणि काही क्षण मी माझ्या लहानपणीच्या शाळेतल्या आठवणीतच गुंतून गेले. पूर्ण जशीच्या तशी आधीची शाळा मला आठवली.कशी होती ती आपली मराठी शाळा आणि कसं होत ते शाळेतली आपली मैत्री. दहा वर्ष कशी गेली भराभर निघून कळलं पण नाही.आज मराठी शाळेला बघितल्यावर तो सुवरणीय भूतकाळ बराच वेळ माझ्या डोळ्यासमोर येत राहिला. सगळ्या शाळेतल्या आठवणी ताज्या झाल्या.शाळेत ती सगळ्यांसोबत खाल्लेली खिचडी आठवली. कसे खिचडी घेण्यासाठी धावपळ करायचो. एकमेकांच्या अंगावर पण पडायचो तरीपण तसेच उठून खिचडी घेण्यासाठी गर्दीमध्ये घुसून बाई मला द्या बाई मला खिचडी बोलायचो .मग धावपळ केली की सर तिथं यायचे आणि सगळ्यांना रांगेत उभे करायचे. मग मज्जा यायची सगळ्यात शेवटी उभ केल की खिचडी उशिरा भेटायची आणि कमी पण भेटायची .काही फायदा व्हायचं नाही खिचडी साठी धावपळ करत येण्याचा. मग काय वाट बघायला लगायची.पण तो क्षण आठवला तर खरचं खुप छान वाटतेय. एकदा सातवी मध्ये असताना सरांनी आम्हाला घर बनवून सांगितली होते.मग आम्ही सर्व मुलामुलींनी सुंदर पृष्ठाचे घर बनवून आणले होते. मस्त वेगवेगळे रंग देऊन वेगवेगळ्या आकाराचे घर आम्ही बनवले होते.त्या घरावरून एका मुलीसोबत माझं भांडण सुद्धा झालं होत. तर मी रागाच्या भरात त्याच्या घराचे तुकडे तुकडे केले होते . आणि त्याने सरांजवळ माझे नाव सांगितले होते .मग काय सरांनी क्लासच्या बाहेर उभ करून घोडी बनवायला लावली होती. मग त्याला खूप आनंद झाला होता. पण माझ्या मनात फक्त एकच याचा बदला घ्यायचा तर घ्यायचा. संध्याकाळी शाळा सुटली आणि त्याला रस्त्यातच अडवल आणि मग काय झाली ना आमची दोघांची केसांची ओढाओढ. खूप आठवतंय ते भांडण पण आज.एकदा ना आमच्या पान पाटील सरांनी इंग्रजीचा क्लास घेतला . आणि सरांनी नेमका प्रश्न मलाच विचारला . आणि मला त्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं होत म्हणून सरांनी मला खूप मारलं होत पण तो तेव्हाचा खाल्लेला मार पण आज खूप गोड वाटतोय. कारण ती माझी शाळा,ते वर्ष, तो क्षण, तो गेलेला काळ आणि ते सर्व माझे मित्र मैत्रिणी विसर्ण्यासरखे नव्हतेच.खूप सुंदर क्षण होता तो माझ्या आयुष्यातला. कोणत्याच गोष्टीच टेन्शन नाही. ना अभ्यासाचं ना पैशासाठी कोणतीच धावपळ ना कोणत्याही जबाबदाऱ्या कोणताच अंगावर,मनावर भार नव्हता. शाळेत असताना सगळे मुक्त होतो. एकमेकांच्या प्रेमाच्या बंधनानी बांधलेले होते. कशी धम्माल असायची ना शाळेत. किती मज्जा करायचो. किती वेगवेगळे खेळ खेळायचो. कबड्डी, खो - खो, लगोरी खेडायचे . आणि खेळांमध्ये एकमेकांना हरवायचे. कुणाला हरवल की खूप मज्जा यायची . कुणी हरलं की खूप चिडवत असायचे.स्वतंत्र दिनाच्या दिवशी पण प्रभात फेरीत किती जल्लोषात घोषणा द्यायचो. सकाळी तो शाळेतला होणारा परिपाठ त्यासाठी किती भांडण करायचे . कुणी गाणे म्हणायचं तर कुणी बोधकथा सांगायचं. खूप सुंदर असा सकाळचा परिपाठ पार पाडायचा.
एकदा हिवाळ्यामध्ये सरांनी कुठ तरी सहल घेऊन जायचं ठरवलं.पण दूर जायचं म्हटलं तर कुणी पैसे देणार नाही म्हणून गावाजवळच जायचं.पण पायी चालत जायचं. सर्वांची घरची परिस्थिती खूप गरिबीची होती.सर्वांना पैसे देणे जमणार नव्हते. म्हणून पायीच चालत जायचं ठरवलं. एक दिवस निघाली ना पायी यात्रा आमची. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एवढी मज्जा केली ना की ती आयुष्यभर पण विसरविशी वाटणार नाही.थंडीचे दिवस होते. सकाळी सहा लाच निघालो खूप थंडी पडत होती. सोबत सर्वांनी पाणी डब्बे सोबतच घेतले होते. थंडीच्या दिवसांमध्ये बोरं खूप येतात. रस्त्याने बोरीचे झाड खूप होते पूर्ण रस्ता भरून सर्वांनी बोर खाण्याचा आनंद घेतला होता. जरा बसायचं जरा उठायचं जीव दमून पण यायचा तरीपण सर्व सोबत मज्जा मस्ती ने अस वाटत नव्हत की आपण दमलो आहोत. बोलता बोलता चालता चालता हसता हसता एवढं मोठा रस्ता कसा पर पडला समजलच नाही. तिथं छोटंसं देवीच मंदिर पण आहे आणि छोटीशी नदी पण आहे .खूप सुंदर झाड झुडप आहेत.निदीच पाणी झरझर वाहते. सुंदर असा हिरवागार निसर्ग आहे. तिथून थोड्याच अंतरावर खूप मोठ्ठा डोंगर आहे. त्या डोंगरावर गेलं की आपण कुणाला आवाज दिला ना तर परत आवाज आपल्याला रिटर्न येतो तास करायला खूप छान वाटायचं. नदीचं पाणी थंडगार होत तिथं आम्ही सर्वांनी अंघोळ केली. मस्त पाण्यात पोहलो पण होतो. एकमेकांच्या अंगावर पाणी उडवायला,एकमेकांना पाण्यात लोटायला.खूप मज्जा यायची.सर्वांच्या अंघोळ करून झाल्या आणि सर्व जण जेवायला बसले. सर्वांना खूप जोरात भुल लागली होती.सर्वजण एका रांगेत बसले .सर्वांनी आपापली डब्बे काढले. सर्वांनी एकमेकांना आपल्या जवळच्या भाज्या वाटप केल्या . तेव्हाच एकमेकांच्या घरच्या वेगवेगळी चव असलेल्या भाज्या खायला मिळाल्या होत्या.आम्ही खूप आवडीने खाल्ल्या होत्या.जेवणाचा कार्यक्रम आटोपला आणि आमचे खेड चालू झाले . मस्त अंताक्षरी खेळलो होतो. सर्वांनी खूप मोठमोठ्याने गाणे म्हटले होते. सर्वांनी वेगवेगळे खेळ खेळले.दिवसभर मस्त मज्जा केली. खूप आनंदाने उत्साहाने सहालचा तो दिवस आम्ही पर पाडला. आणि संध्याकाळी घरी यायला परत निघालो.आज तो सहलचा दिवस परत यावा आयुष्यात माझ्या अस वाटतंय.पुन्हा परत त्याच मित्रमैत्रिणी सोबत सहलीला जावं असं वाटतंय. खरच खूप आठवतोय तो दिवस. डोळे भरून आले माझे.मन भरून आलं.पुन्हा त्याच वाटेवर जावं वाटलं....
दहावीला असताना आम्ही सर्व मुला मुलींनी शिक्षकदिन साजरा केला होता. सर्व मुलंमुली सर मॅडम झाले होते. मुलांनी ड्रेस कोट घातला होता आणि मुलींनी साड्या घातल्या होत्या .सगळे एकमेकांना सर सर मॅडम मॅडम म्हणून चिडवायचे. सर जस शिकवतात ट्स शिकवयचो.प्रत्येकाने वेगवेगळे विषय निवडले होते. तो दिवस सर्वांनी खूप आनंदाने पर पडला होता . खूप मज्जा धम्माल केली होती आम्ही.खूप आठवतोय दिवस आज.
दहावीपर्यंत आमची अकरा जणाची बॅच होती.दहावी नंतर आम्ही कधी कुणाला भेटलीच नाही.कदाचित ते सर्व जण आपल्या शाळेला आपल्या सर्व मित्र मैत्रीणीना विसरले असतील अस वाटत होत. पण काल लहानपणीचा माझा क्लासमेट गजानन च मॅसेज आला आणि घंटा भर आम्ही फक्त शाळेतील आठवणी विषयी बोललो.शाळेतील आठवणींनी आम्ही खूप भावूक झालो होतो.त्याला जॉब लागलाय. पैसा पण आहे.पण कामाचं आणि जबाबदाऱ्या च ओझ पेलन थोड कठीणच असते.शाळेतले ते समाधान, ते सुख, ते क्षण आज पैसा देऊनही न मिळण्यासरखा होत.खरतर शाळेत घालवलेले तो प्रत्येक क्षण अमूल्य होता.
किती वर्गातील मुलांसोबत भांडण करायचो.मुलांना खूप मारून पण घ्यायचो.खूप त्रास दिला होता मुलांना...पण आज त्यांची आठवण आली डोळे भरून येतात.दहावी झाल्यावर त्या मुलांचे चेहरे सुद्धा बघितले नाही.कधी ज्यांच्यासोबत आपण भांडत असायचो त्यांना सॉरी सुद्धा म्हणायचं राहून गेलं.शाळेतील प्रत्येक दृश्य मनात आठवणीच वादळ उभ करत.मी कुणालाच विसरले नाहीय.सगळे जशीच्या तशीच आहेत माझ्या आठवणीत.पण वेळ नाही मिळत कुणाला भेटायला जायला. कारण जबाबदाऱ्या एवढ्या आहेत की घराबाहेर पडण खूप अवघड आहे.आता तर या आठवणी सुद्धा अंधुक होत चालल्या आहेत.घरी एका जागी बसल्या बसल्या एकच विचा मनात येतो की कधी येऊ का आपण पुन्हा एका जागी बसायला.मस्त तेव्हासरख्या मनमोकळ्या गप्पा मारायला, एकाच ठिकाणी बसून डब्बा खायला, कधी राग आला तर एकमेकांसोबत भांडण करायला.शाळेतील आठवणी ताज्या झाल्या की.आनंदाश्रु नी डोळे भिजतात नेहमी माझे.कधी कधी वाटत जर मला भूतकाळात जायचे वरदान मिळाले तर मी शाळेचा वेळ निवडेन आणि पुन्हा शाळेत जाण्याच्या अनुभव घेईन.पण हे शक्य नाही...
एक आठवण कायम राहिली आमच्या आयुष्यात.आमच्या सर्वांच्या आयुष्यात एक सुखद क्षण येऊन गेला.तो म्हणजे आमच्यातला एक खूप जवळचा असलेला आमचा अमरदीप निघून गेला.कदाचित त्याला आवडल नसेल आमच्यात राहण. त्याला आवडली नसेल आमची मैत्री .पण आम्हाला तो खूप आवडत होता.खूप आठवण येते त्याची.अस वाटत त्याने परत यावं आमच्यामध्ये. आय रिअली मिस यू अमारदिप. पुन्हा येशील का रे आमच्या आयुष्यात.खूप मिस करतोय रे तुला आम्ही सगळे.सोडूनच जायचं होत तर आलाच कशाला रे आमच्या आयुष्यात.सॉरी रे बाळा .पण खूप आठवतोय तू आम्हाला.पण जाऊ दे या जन्मात नाही तर काय झालं पण पुढचा जन्म आहे ना आपल्याजवळ. पुढच्या जन्मात नक्कीच भेटू आपण सगळे.
मी नेहमी शाळेच्या आणि तुमच्या सर्वांच्या आठवणीत असते.तुम्हालाही येत असेल माझी आठवण .जर येत असेल तर याल ना कधीतरी पुन्हा एकत्र एकाजागी जमायला. चला मग बाय फ्रेंड्स...काळजी घ्या सर्व जण....
सपना पाटील....✍️
No comments:
Post a Comment