Tuesday, October 5, 2021

जेव्हा परतफेड करायची तेव्हा केली नाही

 ज्यांनी मला जन्म दिला 

ज्यांनी मला हे जग दाखवल

ज्यांनी मला उन्हा तन्हात राबून 

मला एवढं शिकवलं

ज्यांनी मला ते स्वतः उपाशीपोटी 

झोपून माझं पोट भरून झोपवलं

ज्यांनी माझ्या सुखासाठी उभ 

आयुष्य दुःखात घालवल

ज्यांनी मला स्वाभिमानाने 

जगण्यास शिकवलं

ज्यांनी मला अन्यायाविरुद्ध

लढायला शिकवलं

ज्यांनी मला लहानाचा मोठा केला

ज्यांनी माझ्यासाठी हाताचा पाळणा केला 

त्याच माय बापाशी मी आज वैर्यासारखा वागलो

त्यांच्यावर वेळ आली तर तेव्हा 

मीच त्यांच्या तोंडात पाण्याचा 

थेंब सुद्धा टाकू शकलो नाही.

जेव्हा मला परतफेड करायला जमल नाही

तेव्हा मात्र मी स्वतःला अपराधी समजलो....

Sapna patil....✍️



No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी