खूप काही बोलायचे होते
मनातील अश्रू लपवायचे होते
तुझी आणि माझी वाट
झाली होती वेगळी
शब्द अबोल झाले होते
काय असे आपल्यात झाले होते
तू तुझ्या भावना सांगू शकला नाही
मी ही माझ्या भावना सांगू शकले नाही
अथांग सागरातील लाटांप्रमाणे
वादळ येऊन गेलं आयुष्यात
की त्या वादळाला
थांबवता ही आलं नाही
तरीही तुला खूप काही बोलायचे होते
पण आता काही बोलण्यासाठी
कारणच उरले नाही.....
Sapna patil....✍️
No comments:
Post a Comment