Wednesday, February 28, 2024

कॉफी आणि बरंच काही

चल ना जाऊ आपण
त्या पॅलेस हॉटेलवर
घेऊ आपण फक्त कॉफी 
आपल्या पाहिले भेटीवर

तुझ्यासोबत कॉफी घेताना
खूप आवडतं मला
बोलायचं असतं बरच काही
पण कसं बोलू हेच कळत नाही मला....
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

कॉफीचा कप असतो हातात
पण समोर नसतोस तू
एक एक घोट घेत घेत 
फक्त विचारात असतोस तू....
💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

जेव्हा घेत असते मी कॉफी
अन् सोबत तू हवा असतोस
बोलायचं असतं बरच काही
पण तू समोर नसतोस 

घेत होते मी आज चहा 
अन् समोर तू होतास
बघत होते डोळ्यात तुझ्या
पण तू मात्र कुठे गुंतला होतास



No comments:

Post a Comment

परिस्थिती

चल रही है परिस्थिती आपके विरुद्ध तो चलने दो  बह रहा है पानी तो बेशक उसे बहने दो  आएगा समय तेरा भी ढल रहा है दीन तो ढलने दो... हर रात के बाद ...