निसर्गाच्या कुशीत घर माझे वसलेले
त्यात राहावे फक्त तू अन् मी
एकमेकांना सोबत जपलेले
खिडकी माझी उघडताच
दिसावे मज ते सुंदर मनमोहक दृश्य
पिसारा फुलवून मोराने
दिसावे मज त्याचे सुंदर हास्य
खळखळ वाहणारे पाणी
रोजच मला दिसावे
हिरव्या झाडांच्या सावलीत
रोजच मी बसावे
तो पक्षांचा किलबिलाट ही
रोजच ऐकू यावा
उडताना तो पोपट ही
मला बघून हसावा
No comments:
Post a Comment