वाट बघते तुझ्या येण्याची
रंगला तुझ्यात जीव माझा
साद घाल तू प्रीत गंधाची
आवर घालते मी स्वतःस
भास होतो तरी तुझ्या चाहुलीचा
का होते मज असे
आभास ही होतो तुझ्या सावलीचा
छळते का हे मला मन माझे
प्रीतीत तुझ्या रंगताना
रंगून जातो जीव माझा तुझ्यात
आरशात मी स्वतःस बघताना
No comments:
Post a Comment