तिचं मातीच रे घर
चूल पेटते घरात
लाकड जळे भरभर
अरे संसार संसार
उभ्या रानाची चाकर
माझी माय शेतमांधी
हाडं झिजते अपार
अरे संसार संसार
उडती रानात पाखरं
पायी रुततो रे काटा
रंघत येई भरभर
अरे संसार संसार
खाते मिरची अन् भाकर
देखा तिच्या पिलासाठी
जीव टांगे वेशीवर
अरे संसार संसार
बाप हाकतो नांगर
तिचं नशीब डूलते
नांगराच्या फाडावर
अरे संसार संसार
लेक दोन दिसाची पाहुनी
भाऊ बोले अपशब्द
आभाळ येई रे भरुनी
अरे संसार संसार
नको बोलू रे उलटून
नदारीचा संसार तिचा
भाऊ घे रे तू जाणून
अरे संसार संसार
लेक माहेराच सोनं
सासरी जाते सवाशिन
डोळ येते रे भरून
अरे संसार संसार
तीले सर्वांचा आदर
पडत नाही रे कधी
डोईवरचा पदर
No comments:
Post a Comment