नेहा आज खूप दमली होती. कारण आज ती सकाळपासून कामात व्यस्त होती. कामाच्या प्रेशर मुळे तिचा मेंदू पूर्ण पणे थकलेला होता. ती दुपारच्या सुट्टीत कामावरून घरी आली .जेवण केलं आणि थोडा वेळ झोपली. ती बेड वर पडली आणि तिचा तात्पुरता च डोळा लागला आणि तेवढ्यात फोन वाजला. नेहाला फोनचा आवाज ऐकताच खूप राग आला. तिला वाटल कुणी costomer असतील. पण फोन कुणी तरी दुसराच होता . नेहा झोपेतच मोबाईल कडे बघते. आणि समोर काय चक्क आदीचा कॉल. आदीचा कॉल बघताच नेहाचा राग क्षणातच भुर्र होऊन गेला.कारण ज्याची ती तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाक्षणाला वाट पाहत असते. त्याने आज स्वतः कॉल केलेला होता. ती खूप खुश झाली आणि कॉल उचलला .
नेहा : हॅलो
आदी : हॅलो
नेहा : हम्म बोल
आदी : कशी आहेस.
नेहा : चांगली आहे. आणि तू
आदी : मी पण चांगलाच आहे मला काय झालं.
नेहा : हा तू आता चांगलाच असणार ना.
आदी : का ग
नेहा : कारण आता तुझ्यासोबत कुणीतरी आहे तुझी काळजी करायला. मग तू चांगलाच असणार ना.
आदी : हम्म
नेहा : आणि काय रे आज खूप दिवसानंतर तुला माझी आठवण आली? कुठेय तू? घरी नाहीय का? आता कुठं गेली तुझी बायको ? तुझ्या आयुष्यात तुझ्या बायको व्यतिरिक्त अजून कुणीतरी तुला खूप मिस करते हे पण लक्षात ठेवत जा ना...
आदी : घरी नाहीय आता मी गोव्याला आलोय कामानिमित्ताने . आणि हो तुझी मला आठवण नाही आली असती तर आता पोहचता शीच तुला कॉल केला नसता मी.
नेहा : बर बाबा... ठीक आहे. बाकी सांग... काय चालुय तुझं
आदी : बाकी काही नाही ग चांगलं आहे सगळं.
असच बोलत बोलत दोघांच्या खूप गप्पा रंगल्या. एक दीड तास कुठे निघून गेला दोघानाही कळलं नाही. 4 वाजले होते नेहाला परत कामावर जायचे होते. कमावरच्या लोकांचे फोन वर फोन येणे चालू झाले होते. पण दोघांचं ही फोन ठेवायला मन होईना.
तेवढ्यात आदी बोलतो. जा तू कामावर बोलू आपण नंतर.....
नेहा : हम्म
आदी : काही बोलायचं आहे का... बोल जे मनात असेल बोलून टाक....
नेहा : i miss you आदी....
आदी : i love you नेहा love you so much
दोघं ही खूप खुश होते.
नेहा : बर चल मी बोलते नंतर...
आदी : केव्हा करशील कॉल
नेहा : हम्म हम्म उद्या केला तर चालेल
आदी : कामावरून आल्यावर कर ना
नेहा : बघते तसं
आदी : मी वाट बघेल.
नेहा : हम्म
आदी : bye
नेहा कामावर निघून गेली. आणि काम आटपून 7.30 ला घरी आली . घरी आल्यानंतर घरातील कामांनी तिच्या घेवपाटा घेतला. काम करता करता नेहाला 10 वाजले. काम करता करता सुद्धा तिच्या मनात एकच होतं आदीला कॉल करायचंय .नाही केला तर तो खूप रागवेल.सगळ्यांना झोपू द्यायचं मग कॉल करायचा असं तिने ठरवलं. रात्रीचे 11 वाजले .सगळे झोपून गेले होते .पण हिला काही झोप लागत नव्हती कारण खूप दिवसानंतर आदी सोबत बोलणार आहे म्हटल्यावर झोप उडून गेलेली..... तिने आदिला msg केला
hii
hello
zoplas ka
थोडा वेळ वाट बघितली . तिला वाटल झोपला असेल.म्हणून good night msg केला.
.......
थोड्या वेळाने....
तिला पण झोप लागत नव्हती.तिला विचार आला की कॉल करून बघायचं का... ती कॉल करते
तरी पण आदी फोन उचलत नाही.
थोड्या वेळाने आदीचा msg येतो
hii
hello
ok good night
असं बोलून तो झोपून जातो. पण इकडे नेहाला काही झोप लागलेली नसते. पण msg येतो तर तिचं लक्ष नसत.थोड्या वेळाने ती मोबाईल चेक करते. आदीचा msg आलेला दिसतो. ती msg पाहून ती पण त्याला msg करते.
अरे काय हे .... बस एवढच msg करते आणि रात्र भर त्याच्या msg बघण्याची वाट पाहते. पण आदी मात्र तिचा msg पाहतच नाही. तिला खूप वाईट वाटत. दुसरा दिवस उजाडतो पण आदी ऑनलाईन आलेलाच नसतो.मग तिला काळजी वाटायला लागते. म्हणून त्याला डायरेक्ट कॉल करते. खूप वेळा फोन करून होता पण आदी तिचा एकही फोन उचलत नाही. तिच्या मनात विचारांचं काहूर माजते. का उचलत नसेल आदी कॉल. काय झालं असेल. याला कसला राग तर नाही आला.... पूर्ण दिवस ती आदीच्या फोनची वाट पाहत बसते. पण आदी एकदाही तिला कॉल करत नाही. दुसरा दिवस उजाडतो.... दुपारच्या वेळेस ती फ्री असते तेव्हा ती त्याला व्हॉट्सॲपवर msg करायला ऑनलाईन जाते. तर आदी ने तिला डायरेक्ट ब्लॉक केलेलं असते. तिला अजूनच खूप वाईट वाटायला लागते. काय केलं मी काही चुकल का माझं .... ती विचार करायला लागते की काही त्या दिवशी मी काही चुकीचं तर बोलले नाही ना.... मग काय झालं असेल.की हा ना सांगताच निघून गेला.त्याने तिला ब्लॉक केलेलं बघून तिचे डोळे पाणावले.
मन आभाळासारख भरून आलं....
केव्हा आभाळ कोसळेल अन्
डोळ्यातून अश्रूंची बरसात होईल सांगता येणार नाही
मन धसाधसा रडू लागलं....
ती स्वतःच्या मनालाच प्रश्न करत होती. ओरडून ओरडून विचारत होती तिच्या मनाला की का असं माझ्याच सोबत व्हावं. काय गुन्हा केलाय मी की शिक्षा ही मीच भोगावी. का केलं असेल त्याने असं.... बोलायचं च नव्हतं तर का केला असेल त्याने फोन.... का पुन्हा पुन्हा त्याच वाटेवर येवुन सोडतोय मला. विसरत चालले होते मी सर्व काही. आता कुठेतरी जगायला लागले होते. का माझ्याच आयुष्यात पुन्हा पुन्हा तीच वाट..... का अंत बघतोय देवा तू माझा.... खरतर आता असं वाटायला लागलंय की मी जन्म घेतला हाच माझा गुन्हा झाला. तिच्या मनाला आतून कोसत होती.नेहाच मन आतल्या आत तिला खात होतं. मनात वादळ सुटलेलं होत. ते शांत करायला तिच्या आयुष्यात आता कुणीच नव्हतं.... खूप रडते....खूप रडते.... आणि स्वतः च शांत होते.... आणि आपसूकच तिच्या ओठांवर काही कवितेच्या ओळी येतात.....
.
.
.
अंधारल्या दिशा दाही
काळोख आज दाटला
गडदली रात ही दुःखाची
वणवा त्यात पेटला
.....................
No comments:
Post a Comment