त्या नदीच्या तीरावर
मन रमवण्यासाठी
अन् मनसोक्त खेळावं
त्या वाहत्या प्रवाहासोबत
सारे दुःख विसरून जाण्यासाठी
एक निवांत क्षण जगावा
त्या निसर्गाच्या सानिध्यात
मनाची चलबिचल थांबवण्यासाठी
घनदाट जंगल आणि तो
पक्षांचा किलबिलाट ऐकावा
हुरहूर जीवाची घालवण्यासाठी
असाही एक निवांत क्षण जगावा
आयुष्यातील दुःख विसरण्यासाठी....
No comments:
Post a Comment