मैत्री.... रोज होणारी पहाट
मैत्री.... साता समुद्रापार
मैत्री.... कधी दोस्त तर कधी यार.....
मैत्री.... सुख दुःखाचा झरा
मैत्री.... सुसाट सुटलेला वारा....
मैत्री म्हणजे सुख दुःखाची सोबत
मैत्री म्हणजे प्रेमाची संगत
मैत्री म्हणजे अतूट विश्वास
मैत्री म्हणजे मनास लागलेला ध्यास
मैत्री म्हणजे मन हलकं करण्याची जागा
मैत्री म्हणजे एक विश्वासाचा धागा
मैत्री म्हणजे मज्जा मस्ती आणि धम्माल
मैत्रीतच असते जगण्याची कमाल
मैत्री म्हणजे कट्टी आणि बट्टी
कितीही होऊ दे दंगा तरीही करते ती गट्टी...
No comments:
Post a Comment