मनातील शब्द ओठांवर आणू कसे
हेच मला कळत नाही
लिहायचं तर होत बरच काही
पण म्हणावं तसं सुचत नाही
मनातील भावना डोळ्यांनी सांगू कसे
हेच मला समजत नाही
लिहायचं तर होत बरच काही
पण म्हणावं तसं सुचत नाही
शब्दांना अर्थांमध्ये तुला सांगू कसे
हेच मला उमगत नाही
लिहायचं तर होत बरच काही
पण म्हणावं तसं सुचत नाही
अर्थाना भावानमध्ये उतरवू कसे
हेच मला जमत नाही.....
लिहायचं तर होत बरच काही
पण म्हणावं तसं सुचत नाही....
भावनांना श्वासा मध्ये मिळवू कसे
हेच मला येत नाही....
लिहायचं तर होत बरच काही
पण म्हणावं तसं सुचत नाही....
निस्वार्थ या ध्यासाला तुझ्यात बघू कसे
हेच मला कळत नाही....
लिहायचं तर होत बरच काही
पण म्हणावं तसं सुचत नाही.....
Sapna patil....✍️
No comments:
Post a Comment