Tuesday, October 5, 2021

स्वप्नाच्या दुनियेत

 तूझ्या स्वप्नांच्या दुनियेत 

मला येऊ देशील का

त्या दुनियेत तुझ्या हक्काची 

जागा मला देशील का

जरी झालास तू भविष्यात कुणाचा 

तरी माझ्यासाठी तुझ्या हृदयात 

थोडीशी जागा ठेवशील का

सांग ना थोडीशी का होईना 

पण ती हक्काची जागा मला तू देशील का

तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत भरशील 

तू ही ते तिच्यासोबत विविध सप्तरंग

पण त्या सप्तरंगात तील एक रंग 

माझ्या प्रेमाचा भरशील का

सांग ना तुझ्या हृदयात 

माझ्यासाठी ही एक छोटासा

हक्काचा soft corner ठेवशील का

खूप प्रेम करते तुझ्यावर म्हणून एवढा तरी 

हक्क माझा तूझ्या वर राहू देशील का

होईल एक दिवस आपली पण भेट

देईल मी तुला ते सारे हक्क 

असे वचन देते मी तुला

पण ते माझं वचन घेण्यासाठी 

हात तुझा पुढे करशील का....

खूप वाटत मला तुझी 

स्वप्नांची दुनिया असावी

त्यात थोडीशी का होईना पण 

माझी हक्काची जागा असावी....

सांग ना हे छोटंसं स्वप्न तू 

माझं पूर्ण करशील का.....


Sapna patil ✍️✍️❤️



No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...