Tuesday, October 5, 2021

तूझ्या मनातले ओळखता ही आले नाही

 कधी तुझ्या मनातलं 

ओळखता ही आले नाही 

म्हणून का आपण आज 

सोबत राहिले नाही

तू पण पटकन काही 

सांगितले नाही

आणि मलाही तूझ्या 

मनातले कळले नाही

पण........

मनातलं जाणून घ्यायला 

मी काही जोतिष तर नाही 😄

मग कस कळणार मला 

तुझ्या मनातल गुपित काही

तू खूप म्हणत होतास मला 

की मला तू ओळखू शकत नाही

पण पूर्ण ओळखले मी तुला 

तेच तुला समजले नाही.....


Sapna patil.....✍️✍️



No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी