Saturday, October 8, 2022

ती भयावह रात्र

ती अमावस्येची रात्र खूप भयावह होती. घराच्या चारही बाजूने कुत्रे भुंकत होते. रात्रीचे बारा वाजले होते.ती त्या दिवशी घरात एकटीच होती. तिला जाग आली. तेवढ्यापुरते डोळे उघडले. आणि परत लावून घेतले. तिच्या रूम जवळून कुणीतरी गेलं असा तिला भास झाला. तिने दचकून डोळे उघडले. आणि हळूच बेडवरून खाली उतरून दरवाज्याच्या दिशेने चालत चालत गेली. हळूच दार उघडलं. पण तिथं कुणीच नव्हतं. तिने सुटकेचा श्वास घेतला. भीतीने घसा कोरडा पडला होता ती पाणी प्यायला किचन मध्ये गेली. पाणी पीत असताना पुन्हा किचनच्या दारा जवळून कुणीतरी गेलं. पुन्हा ती घाबरली. आता तिला जास्तच भीती वाटायला लागली. तेवढ्यात मांजराच्या ओरडण्याचा आवाज आला. तिने पुन्हा सुटकेचा श्वास सोडला. .... .ती तिच्या बेडरूम मधे गेली. आणि बेड अंग टाकलं. झोपायच म्हटल तर एवढ्या वेळात तिच्या डोळ्यांची झोपच उडाली होती. आता तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होत. कोण असेल तो काय असेल ते की मला भास झाला. नाही पुन्हा पुन्हा भास कसा होणार. नक्कीच कुणीतरी आहे . मला बघायला हवं. ती लगेच उठते आणि हळूच दार उघडून बाहेर जाते पण तिला बाहेर कुणीच दिसत नाही. फक्त अंधार आणि सुनसान पडलेलं घर रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज.तेवढ्यात तिला घरातून कसला तरी हसण्याचा आवाज आला . आता ती पर घाबरून गेलेली. तिच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या.आता तिला घरात जायची पण भीती वाटायला लागली. तरीही कशी तरी धाडस करून ती हळूच अलगद पावलांनी घरात शिरली. आणि समोर पाहते तर काय..... एक बाई पंख्याला उलटी टांगलेली. 😳😳 तिने पाहताक्षणी मोठ्याने किंचाळी मारली. आणि ती तिथच बेशुद्ध झाली. 

✍🏻


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...