अन् निशब्द होऊन जातात....
हृदय धडधडू लागते
अन् स्तब्ध होऊन जाते
काय समजावे या
अबोल भावनाना
कसे समजावू या
श्वासातील स्पंदनांना.....
न जाणे कशाची चाहूल
मनाला घोर लावून जाते
आठवण तिची येताच
मनात काहूर माजून येते...
अन् पुन्हा तिच ओढ लागते....
तिला बघण्याची.....
अबोल डोळ्यांनी
सर्व काही व्यक्त करण्याची
सावर रे मना सावर.....
No comments:
Post a Comment