Tuesday, October 5, 2021

मी शेतकरी बोलतोय



किती सत्व घेशील रे निसर्गा 

काय मिळते रे घेऊन 

तुला आमची मजा

उन्हा तन्हात राबराब 

राबतो य माझा शेतकरी राजा....

तोंडी आलेला घास तू 

हिरावून नको घेऊस 

कशाला पडतो रे तू 

भलत्या वेळेस पाऊस.....

अख्ख्या जागाच पोट मी भरतोय 

या इवल्याश्या अंकुराने 

नको त्याच पुढचं ताट तू ओढुस 

भलत्या वेळच्या पावसाने.....

मीच नसला तर हे

जग काय खाईल 

त्यांना नाही मिळालं अन्न 

तर हे जग मरून जाईल.....

खूप मोठ्ठं कर्ज आहे रे 

माझ्या डोक्यावर

मुलाबाळांची स्वप्न पूर्ण करण्याचं 

ओझ आहे माझ्या खांद्यावर.....

बीजाचे अंकुर करतो 

अंकुरााचे फुल बनवतो

फुलाचे फळ मी करतो

आणि तोंडाशी आलेला 

घास माझा तू का रे ओढतो....

हे निसर्गा नको रे घेऊ 

माझी ही सत्वपरीक्षा

मी उगवलेल्या अंकुरच 

पीक येऊ दे हीच होती रे 

तुझ्याकडून अपेक्षा....

नको आणू ती माझ्यावर 

आत्महत्येची पाळी

एवढं मोठ्ठं कर्जाच ओझ 

नको लिहू माझ्या भाळी....

होऊ दे मला कर्जमुक्त

दे तू माझ्या पिकाला भाव

तेव्हाच पडेल माझ्या 

लेकरांवर छाव...

काळया मातीत सोन मीच उगवतो 

अख्ख्या जगाचं पोट मीच भरतो

आणि फाटलेली गंजी सुद्धा मीच घालतो

मग तू मलाच का हा दिवस दाखवतो....

सांग निसर्ग सांग 

आज मी तुला प्रश्न विचारतोय 

हे नालायक सरकार आज

मलाच का फसवतोय.....

Sapna patil....


2 comments:

  1. शेतक-यांच्या दु:ख ,दैन्याची आणि मेहनतीची व्यथा,पण स्वप्नभंगाची वास्तवता मांडणारी रचना...����

    ReplyDelete

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...