वाट पाहतोय मी त्या येणाऱ्या पावसाची
मी पेरलेल बीज उगवण्याची
वाट पाहतोय मी त्या बीजाला अंकुर फुटण्याची
वाट पाहतोय मी त्या अंकुराच सोनं होण्याची
वाट पाहतोय मी , मी केलेल्या कष्टाच्या फळाला भाव मिळण्याची
वाट पाहतोय मी कर्जमुक्त होण्याची
वाट पाहतोय मी माझ्या मुलांचे स्वप्न साकार करण्याची
वाट पाहतोय मी,
त्या तळपत्या उन्हात काम केलेल्या कामाला न्याय मिळण्याची
वाट पाहतोय मी माझ्या डोक्यावरचं ओझ कमी होण्याची
वाट पाहतोय मी माझं आयुष्य सुखात जगण्याची
Sapna patil...✍️✍️
No comments:
Post a Comment