स्वतःला घडवताना आधी जीवाचे रान करावे लागते
पायात रुतला काटा म्हणून डोळ्यातील अश्रू पुसावेच लागते
समाजाच्या कठोर नजरेला टाळावे च लागते
कारण स्वतःला घडवण्यासाठी टाकीचे घाव सोसावेच लागते
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी झुंजावे च लागते
स्वतःला घडवताना तळपत्या उन्हात तडपावे च लागते
रखरखत्या रानात जळून कष्टाच्या घामात झिजावे च लागते
स्वतःला घडवण्यासाठी आपण केलेल्या संघर्षाची जान ठेवावीच लागते
स्वतःला घडवण्यासाठी समाजाकडे दुर्लक्ष करावेच लागते
आयुष्य खूप कठीण आहे ते जगण्यासाठी आधी स्वतःला घडवावेच लागते
जगात कुणीच कुणाच साठी नाहीय हे मान्य करावेच लागते
म्हणून स्वतःला घडवण्यासाठी स्वतःलाच कष्ट घ्यावेच लागते
आयुष्यात खूप दुःख सोसावे लागते
पण आपण रडत न बसता आनंदाने आयुष्य हे जगावेच लागते
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ठेच ही लागेलच
ठेच लागल्यावर वेदना ह्या होतीलच पण
त्या वेदनांना सुद्धा आनंदात स्वीकारावेच लागते
म्हणून स्वतःला घडवताना जीवाचे रान करावेच लागते....
म्हणून सांगते आयुष्य खूप सुंदर आहे
ते सुंदर जगण्यासाठी आधी स्वतःला घडवावे च लागते....
😊😊😊
No comments:
Post a Comment