मनाला बेभान करून जातं
क्षणात आस लावून जातं
नेहमी आठवण करून देतं
तुझ ते हसणं....
डोळ्यांना भाऊक करून जातं
शब्दांना ओठांवर येऊन थांबत
मनाला स्तब्ध करून जातं
तुझ ते हसणं....
हृदय धडधडायला लागतं
हृदयाला स्पर्श करून जातं
तुझं ते हसणं
श्र्वसांच गहिवरून येणं
मनाचं काहुरून जाणं
तुझं ते हसणं
गालावरच्या खडीच येणं
डोळ्यांच्या धुंदीत जाणं
मनाचं मोहरुन येणं
तुझं ते हसणं....
Sapna patil...✍✍✍
No comments:
Post a Comment