खरच सांगतेय तुला........
असले जरी मी याच्यासोबत तरी
स्वप्न तुझ्यासोबत चेच पाहिल,
या जन्मात नाही पूर्ण झाल ,
पण पुढच्या जन्मात नक्कीच होईल....
आयुष्यभर वाट पाहील तुझी
माझ्या आयुष्यात येण्याची
नको वाट तोडू माझी ,
तुझ्यासोबत चे स्वप्न बघण्याची....
कशी थांबाऊ मी माझ्या मनाला
तुझी होण्यापासून,
खरच सांगतेय तुला
अपूर्ण आहे रे माझं आयुष्य तुझ्यावाचून....
आजही तशीच आहे ही
जशी तुला हवी होती
पण खरच सांगतेय तुला
ती बदललीय आज ती
फक्त तिची मजबुरीच होती....
आज तू माझं हृदयाचे तुकडे होतील
असे तू शब्द वापरून गेलास
पण खरच सांगतेय तुला
ती जे होती ते खरच होती
त्याला तू दिखावा करते अस बोलून गेलास...
जग तू तुझ आयुष्य , मरू दे मला
जेव्हा तू अस बोलून गेलास 😢
खरच सांगतेय तुला
हे ऐकल्याने माझं काय होईल
याचा विचार तू नाही केलास.....
जे माझं खर प्रेम होत
ते तू देखव्यामधे मोजलं
पण खरच सांगतेय तुला
अजूनही तुला माझं प्रेम नाही समजल.....
पूर्ण अधिकार आहे तुला
माझ्यावर रागवण्याचा
वाटलं तर शिव्या पण दे मला
पण खरच सांगतेय
प्रेम केलय यार मी तुझ्यावर
अस सहजासहजी नाही सोडणार मी तुला......
आलास माझ्या आयुष्यात
आणि मला खूप काही शिकवलंस
जात होते मरायला आणि
तिथं पण मला तूच अडवलस......
Thank you so much
Sapna patil......✍️
No comments:
Post a Comment