Wednesday, October 6, 2021

माझं पहिलं प्रेमपत्र

 


Hello.... 

मित्रानो मी माझ्या आयुष्यातील लिहिलेलं पहिलं प्रेमपत्र मी कस लिहिलं ते सांगते . माझ्या क्लास मधे एक दीप नावाचा मुलगा होता. तो खूप हुशार मुलगा होता क्लास मधे टॉपर होता .आम्ही दोघं पण टॉपर होते. तो मुलांमध्ये आणि मी मुलींमध्ये . दोघांचं compitationचालायचं. पण तो एक दोन मार्क ने पुढेच असायचा . मी खूप प्रयत्न करायची त्याच्या पुढे जाण्याचा पण तो मला पुढे जाऊच देत नव्हता. मी अस करायला लागले की मला खूप हसायचा.आणि मला चिडवायचे . असच हळू हळू आमच्या मधे चालू असताना कस एकमेकांच्या प्रेमात पडलो कळलच नाही. तो मला आणि मी त्याला खूप आवडायला लागलो. एकमेकांकडे पहायचो एकमेकांकडे बघून हसायचो. गावात पण तो माझ्या गल्लीतून काही काम नसताना पण यायचा . नुसता मला बघण्यासाठी. असच आमचं प्रेम वाढत गेलं . पण फक्त नजरेनं , मनाने . एकमेकांसमोर मंडलच नाही. त्याने खूप वेळा प्रयत्न केला मला सांगायचं पण त्याला वाटायचं हिला सांगितलं तर हिला वाईट वाटेल का ? ही तिच्या घरी सांगून देईल का ? यासाठी तो काहीच बोलायचं नाही. पण जे त्याच्या मनात होत तेच माझ्या पण मनात होत . मग मीच ठरवलं की याला आपणच सांगून टाकावं . मग मी त्याला  पत्र  लिहून द्यायचं अस ठरवलं . एक दिवस मी त्याला त्याची मराठी homeworkची वही मागितली . त्याने ती दिली . पण मला वही च काहीच काम नव्हत. मी त्याला ती वही मी लिहिलेलं प्रेम पत्र त्यात ठेऊन द्यायला मागितली होती. मग मी त्याला पत्र लिहिल . मी त्यात लिहिलं होत. Hii दीप मला तू खूप आवडतोस. आणि मी तुझ्यावर खूप जिवापाड प्रेम करते . पण तू माझ्यावर प्रेम करतो की नाही हे माहीत नाही. पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. I love you दीप . अस लिहून मी ते पत्र त्याच्या वहीत ठेऊन दिलं आणि ती वही त्याला परत केली. पण त्याने ती वही दोन दिवस पहिलीच नाही. तिसऱ्या दिवशी मराठीच्या सरांनी मराठी होमवर्क च्या वह्या चेक करायला सांगितल्या होत्या. सर वह्या चेक करायला लागले . दीप चा नंबर आला आणि दीप वही घेऊन सर कडे गेला . आणि मग जे पत्र दीप ला वाचायचं होत ते  पत्र दीप ने न वाचता सरानीच वाचलं की. मग काय झाली ना फजिती राव . 😀😀 आणि पुढे काय झालं असणार ते तुम्हाला पण माहीतच आहे .सरांनी दीप ल विचारले कोणी लिहिलय हे पत्र सांग लवकर . काय झालं होत ना की मी पत्र लिहिलं पण पत्रात माझं नावच लिहायचं विसरून गेले होते. दीप काहीच न बोलता शांत खाली मान घालून उभा राहिला . पण सर दीप वर ओरडत होते ते मला खूप वाईट वाटत होत.मग मी निमुटपणे उभी राहून सरांना सांगितलं की सर मी लिहिलय ते. मग काय सर मला पण बोलायला लागले. मग सरांना पण माहिती पडून गेलं. मग आमचं प्रेम प्रकरण तिथेच थांबलं. आणि सरांनी ते  माझं पहिलं प्रेमपत्र सर्वांसमोर  फाडून टाकल. आणि माझ्या प्रेमाचे तुकडे केले . असच कधीपासून चाललेलं आमचं प्रेम 5 ते 10 मिनिटात संपलं. या गोष्टीचं आम्हाला खूप वाईट वाटल होत . आणि आम्ही तिथेच थांबलो. दिपने दुसऱ्या कॉलेजला admissionघेतलं आणि मी दुसऱ्या कॉलेजला admission घेतलं. आणि आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो. 

😔😔😔


सपना पाटील.... 😊✍️



No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...