Wednesday, October 6, 2021

ती येत आहे जन्म घेऊन


आर्त हाक.......


Request...... ती येत आहे जन्म घेऊन......

जन्म घेऊन येत आहे मी तुझ्या आयुष्याची 

वाट बनायला तू बघ....

पण त्या आधी बघू दे तू मला पण हे जग...


जन्म घेऊन येत आहे मी माणसातील 

माणुसकी जिवंत करायला तू बघ....

पण त्या आधी तू बघू दे मला हे जग....


जन्म घेऊन येत आहे मी या माणसातील 

प्रवृत्तीला मारायला तू बघ.... 

पण त्या आधी बघू दे मला तू हे जग....


जन्म घेऊन येत आहे मी या माणसातील 

अमानुषतेे चा नाश करायला तू बघ....

पण त्या आधी बघू दे तू मला हे जग....


जन्म घेऊन येत आहे मी तुझ्या अंधारलेल्या 

आयुष्यात प्रकाश द्यायला तू बघ...

पण त्या आधी बघू दे तू मला हे जग...


जन्म घेऊन येत आहे मी माझ्यासारख्या 

चिमुकल्यांच जगणं निर्धास्त, सुरक्षित करायला 

आई तू बघ....

पण त्या आधी बघू दे तू मला हे जग....


जन्म घेऊन येत आहे मी या देशाचं भवितव्य

उज्वल करायला आई.... तू बघ...

पण त्या आधी बघू दे तू मला हे जग....

पण त्या आधी बघू दे तू मला हे जग.....

Please Save the girl child....🙏🏻 

Sapna patil....✍✍✍✍



No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...