स्पर्श तुझा.......
संध्याकाळच्या गारव्यात तुला मी आठवलं...
जणू काही तुझा स्पर्श झाला अस जाणवलं...
तो अंगाला झोंबणारा थंडगार वारा मनाला स्पर्श करून गेला... आणि
तुझं ते गोंडस प्रतिबिंब मनात साठवल...
तो संध्याकाळचा गारवा तुझी चाहूल देत होता,
आणि तुझी चाहूल येताच मनाला हुरहूर जाणवलं...
पावसाच्या रिमझिम सरित तू मला अल्लड नजरेनं पाहिलं...
मग मी तुझ्या हळूच जवळ येऊन मी मला तुझ्या डोळ्यात शोधलं...
डोळ्यात तुझ्या पाहताच मला माझं प्रेम दिसलं...
विजेचा कडकडाट होताच तू मला अजुन जवळ घेतलं...
नात ते आपलं सात जन्मच अजून घट्ट झालं....
आणि त्या पावसाच्या सरीत आपण एकमेकांत इतके गुंतलो की वेळेचं भानच नाही राहिलं...
आणि वेळ इथंच थांबावी अस वाटलं....
Sapna patil....✍️✍️✍️✍️✍️
No comments:
Post a Comment