Wednesday, October 6, 2021

फक्त तुझं व्हावं वाटतयं



 मला पण खूप वाटत 

तुझ्या सोबत राहावं...

खूप वाटत की तुझ्याच 

सोबत लग्न करावं... 

खूप वाटत मला माझ्या 

आयुष्याची स्वप्न तुझ्यासोबत 

रंगत करावं..


वाटत मला पण माझा 

हात नेहमी तुझ्या हातात असावा

खूप वाटत मला की तुझी 

नवीन आयुष्याची सुरुवात 

माझ्यापासुन व्हावी.


वाटत मला पण की तुझ्या 

प्रत्येक सुख दुःखात मी 

तुझ्या सोबत असावं

खूप वाटत मला की मी तुझी 

आयुष्यभर राणी बनून राहावं...


वाटत मला पण तुला 

फक्त माझ्याच कुशीत घ्यावं...

खूप वाटत मला की 

तुझ्यावर फक्त मीच प्रेम करावं...

तुझ्यावर फक्त आणि फक्त 

माझाच अधिकार असावा...


खूप वाटते मला की मी माझं 

पूर्ण आयुष्य फक्त 

तुझ्या साठीच जगावं...

वाटत मला पण की तुला 

आयुष्यभर फक्त मीच सावराव...


खूप वाटत मला की आपल्या 

आयुष्यात कितीही संकट

आले तरी त्यांना आपण 

दोघांनी मिळून समोर जावं..

वाटत मला पण आपल्या 

आयुष्याचं चक्र आपल्याच 

हातात असावं...


खूप वाटत मला की तुझी 

सकाळ पण माझ्या सोबतच व्हावी.... 

आणि रात्र पण माझ्यासोबत च संपावी...

खूप वाटत मला की मी फक्त 

आणि फक्त तुझ्याच साठी जगावं...


वाटत मला पण की फक्त 

तूच माझा शेवट आणि 

मीच तुझा शेवट असावं...

खूप वाटत रे मला की हा 

माझा श्वास पण फक्त 

तुझ्याचसाठी असावा...


खूप वाटत मला की तुझ्या 

डोळ्यात फक्त मीच राहावं...

वाटत मला पण की तुला मी

फक्त माझ्यातच सामावून घ्याव...

आणि आयुष्यभर तुझ्या असच सोबत राहावं...


खूप वाटत मला की तुझ्या 

आयुष्याची सुरुवात ही मीच व्हावं...

आणि शेवटही मीच व्हावं...


Sapna patil~~~~✍️✍️✍️ 



No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...