Wednesday, October 6, 2021

मुलं मोठी होताना



जसं झाडावरची कळी जशी हळूहळू फुलते तशीच आपली मुलं पण मोठ्ठी होतात
त्यांना जर का चांगलं खात पाणी मिळालं तर ती अशी फुलतात अशी रुजतात अशी उमलतात की त्यांच्यासमोर मोठ मोठे फुल पण फिके पडून जातात 
असच आपल्या मुलांचं पण असते मुलं मोठी होताना त्यांना चांगल्या संस्कारांची गरज असते 
त्यांना मोठ होताना आई वडिलांच्या प्रेमाची ,मैत्रीची गरज असते . तेव्हा मुलं चांगल्या प्रकारे घडू शकतात. जसं फुलांना चांगला सूर्यप्रकाश मिळाला की त्या फुलाला सुंदर असा आकार येऊन जातो तसच आपल्या मुलांना पण ती मोठी होताना त्यांना आपल्या प्रेमाची गरज असते तेव्हा तेव्हाच त्यांच्या जीवनाला पण आकार येतो.... नाहीतर प्रेम नसल तर ते पण कोमेजून जातात... 
Sapna patil ✍️✍️✍️....


No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी