घरापासून दूर जाताना
खूप वाईट वाटते
राहिलेल्या आठवणी सोबत
असताना फक्त पाणीच
डोळ्यामध्ये दाटते
घरापासून दूर जाताना
मन माझं भरून येते
प्रश्न असतो पोटाचा घर सोडून
कुठ तरी बाहेर जावच लागते
प्रश्न असतो त्या आयुष्याचा
आयुष्याला आकार देण्याचा
त्याला आकार देण्यासाठी
घरापासून दूर जावं लागतं
घरापासून दूर जाताना फक्त
आठवणी सोबत घेऊन जाते
इथं कोणीच नाहीय आपल
फक्त हेच मनात राहून जाते
आणि कोण आपलं आणि कोण
परक याची जाणीव होऊन जाते....
घरापासून दूर जाताना मनाची
खूप तयारी करावी लागते
मनी आलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी
घापासून दूर जावं च लागते....
Sapna patil....✍️
अप्रतिम रचना केली सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteThanks 🙏
ReplyDelete