तू पहाट होऊन आलास
आयुष्यात माझ्या
मी तुझ प्रेम होऊन
गेली आयुष्यात तुझ्या
तू रात्र होऊन आलास
आयुष्यात माझ्या
मी एक स्वप्न होऊन
गेली आयुष्यात तुझ्या
तू किरण होऊन आलास
आयुष्यात माझ्या
मी एक आंधरलेली रात्र होऊन
गेली आयुष्यात तुझ्या
तू तो बहरलेला निसर्ग होऊन आलास
आयुष्यात माझ्या
मी ते कोमेजलेल्या झाडाचं सुकलेल
पान होऊन गेली आयुष्यात तुझ्या
तू तर खरच खूपच सुंदर प्रेम
निभावून गेलास आयुष्यात माझ्या
मी तर खरच काळोख करून गेली रे
आयुष्यात तुझ्या...
😔😔😔😔
Sapna patil....✍️✍️✍️
No comments:
Post a Comment