Sunday, October 10, 2021

स्त्री जन्म ....


कळत नाहीय मला की त्या 

वेळेन यावं की नाही यावं पुन्हा...

मी स्त्री म्हणून जन्म घेतला हा 

होता का माझा तो गुन्हा.... 

कळत नाहीय मला की हा समाज मी स्त्री 

असल्याची का करून देतोय मला जाणीव

कोणत्या गोष्टीची मी पूर्ण करू शकत नाही उणीव

मग या वेळेन यावं की नाही यावं पुन्हा

जिच्या  उदरातुनच हा समाज निर्माण झाला 

मग तिच्याच चारित्र्यावर डाग का लावून गेला

मग का तिला स्त्री म्हणून हिनवून गेला

मग तिच्या त्या वेलेन यावं की नाही यावं पुन्हा...

स्त्री म्हणून जन्म घेतला हाच का तिचा गुन्हा.....

तिच्या सर्व इच्छांना मारत जाते

जे पुढे आलं त्यालाच स्वीकारते

दुसऱ्यांसाठी तिच्याच सुखाचा त्याग करते

तरी पण तीच का प्रत्येक गोष्टीत हिनवते....

मग तिच्या त्या वेलेण यावं की नाही यावं पुन्हा...

स्त्री म्हणून जन्म घेतला हाच तिचा गुन्हा.....

                                 - sapna patil.....



2 comments:

  1. भाव चिंतन काव्यलेखन मॅडम!✍️👌👌👌

    ReplyDelete
  2. भावस्पर्शी रचना केली सखी ✍️��

    ReplyDelete

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...