गेले होते रानात फिरायला
तिथं मला तहान खूप लागली होती
पाणी नव्हते तिथं
घरी जाण्याची आस खूप लागली होती
घरी जायला वेळ खूप होता
मला लागलेली तहान कशी भागवू
हाच विचार मनात होता
वाट खूप मोठ्ठी होती
घरी पोहचेल की नाही
मनात भीती खूप होती
तहान लागल्यामुळे
घसा कोरडा झाला होता
आता काही खर नाही
या भीतीने जीव कासावीस झाला होता
छोट्याशा वाटेतून चालताना
समोर खूप मोठी खोल
दरी लागली होती
त्या खोल दरीला बघून
नजर माझी फाकली होती
पाय घासरून दरीत
मी कोसळली
आणि तिथच माझ्या
जीवाची लाही लाही झाली
माझा शेवटचा श्वास मी तिथं
खोल दरीत सोडला होता.
माझी तहान भागवायला
तिथं माझा काळ आला होता
शेवटची एकदाची
भागली माझी तहान
तेव्हा माझ्या काळाने
कार्य केले महान
अशी माझ्या आयुष्याची
शेवट बनली माझी तहान....
Sapna patil....✍️✍️✍️✍️
No comments:
Post a Comment