Wednesday, October 6, 2021

प्रेम केलं गुन्हा नाही

 


प्रेम केले रे मी फक्त 

नाही केला मी कोणता गुन्हा

खूप वाट बघतेय तुझी
ये ना परत माझ्या आयुष्यात पुन्हा

काय पाप केलय मी की
तू देतोय मला एवढी मोठ्ठी शिक्षा
तू फक्त माझ्या सोबत रहा
याच माझ्या प्रेमाची मी
तुझ्यासमोर मागतेय  भिक्षा....🙏

मी केलेल्या कर्माच
फळ मला मिळतंय
राहिलेल्या तुझ्याच
आठवणीत
मन माझं जळतयं....

तुझ्यावर प्रेम केलं
ही आहे का रे माझी चूक
बोल ना रे एकदा माझ्याशी
लागलीय मला तुझ्या त्या
प्रेमळ शब्दांची भूक.....

का सतावत आहे तू मला
का घेतोय तू माझी परीक्षा
तुझ्या प्रेमा व्यतिरिक्त तुझ्याकडून
काहीच नव्हती रे मला अपेक्षा.....

तू बोललेला एक एक शब्द
माझ्या कानात गुंजत आहे
खरच सांगतेय तुला
तुझी आठवण खूप येत आहे....

प्रेमच केलं मी फक्त
तुझ्यावर नाही केलं कोणतं पाप
कोणत्याच गोष्टीची
नाही देणार कधी तुझ्या मनाला धाप.....

नाही केला रे यार
मी कोणता गुन्हा
खूप वाट बघतेय तुझी
ये ना परत माझ्या आयुष्यात पुन्हा...



Sapna patil.....✍️

No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...