Wednesday, October 6, 2021

मी एकटी......



नाही वाटत मला दुःख 

या अकाली मृत्यूच 

दुःख वाटत ते तुझ्या नशिबी 

आलेल्या एकाकी पणाच

दुःख वाटत ते तुझ्या डोळ्यातून 

उडून गेलेल्या तेजाच

नाही थांबवू शकत तुझ्या 

डोळ्यातून वाहणाऱ्या 

अश्रूंचे पाट मी आता

कारण तुझ्या आयुष्यातील 

माझ्या असण्याच अस्तित्व 

आता फक्त एक भूत गाथा 

नाही राहील आपल कुणी

नाही ठेवायची कुणाची आशा

आपण एकटेच आहोत 

हीच आपल्या कर्माची पाशा....


Sapna patil....✍️



No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी