तू ही शांत मी निवांत
शांत आहेत त्या चांदण्या
भाव माझे बोलले
हर्ष मनी खूप झाला
मन मिलन होताना
वेचल्या मी कविता
चांदण्यात फिरताना....
चंद्र तारे,नभ आणि
सोबत ती थंडगार हवा
अंगाला झोंबून गेले
या गारव्यात मी
स्वप्नात बुडून गेले
गालातच हसू फुलले
स्वप्नभंग ही होताना
वेचल्या मी कविता
चांदण्यात फिरताना....
स्वप्न एक मी पाहिले
तू सोबत असताना
नकळत तू वेढलास
नजरा नजर होताना
वेचल्या मी कविता
चांदण्यात फिरताना....
Sapna patil.....✍️✍️✍️✍️
खूपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteThanks mam🙏🏻
Deleteमस्त लिहिलंय मॅडम! सुंदर कल्पनारम्यता!✍️������
ReplyDeleteThank you sir
Deleteअतिशय सुंदर कल्पना सखी 👌 👌👌👌
ReplyDeleteThanks 🙏
ReplyDelete