त्या दिवशी माहेरी गेली असताना माझी गाडी माझ्या मराठी शाळेजवळ थांबली. गाडीच टायर पंक्चर झाल होत. मी गाडीतून खाली उतरली आणि माझं लक्ष शाळेतील माझ्या वर्गाकडे गेलं. त्या वर्गाला पाहता क्षणी मी माझ्या भूतकाळात गेले. ते लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. शाळेत जे घडलेलं होत ते चित्र सगळ जशेच्या तसच डोळ्यासमोर आलं. शाळेत बसलेली सर्व आम्ही मुलं मुली, एका बाजूला खिचडी शिजवत असताना त्या बाई, ती खो - खो ,कबड्डी खेळणारी मुलं सगळ सगळ आठवलं. एकदा सरांनी आम्हाला मातीच्या वस्तू बनवून सांगितल्या होत्या. मग कुणी सीताफळ कुणी मिरची , वांगी अशा वस्तू बनवून आणल्या होत्या. त्यांना त्याच वस्तूचे रंग देऊन खूप सुंदर सजवले होते. पण वर्गातील काही मुलांनी आमच्या वस्तू तोडून टाकल्या होत्या . आणि मग काय त्या मुलांशी एवढं जोरात भांडण केलं होत राव की सांगूच नाही शकत. 😄😄 मस्त मज्जा आली होती त्यांची. सरांना पण सांगितलं होत त्यांचं नाव . मग सरांनी त्यांना कण पकडून घोडा बनवायला लावलं होतं. आम्हा मुलींना खूप भारी हसायला आलं होत. 🤗🤗 खूप आठवतात ते शाळेचे दिवस. पण त्यांना तेव्हा sorry च mhnaych राहून गेलं.वर्गामध्ये मी पहिल्याच बेंच वर बसायची. मग काय वर्गात सर्वांसोबत leader सारखी वागायची. मुलं पण एक आवाजात शांत बसायचे. ते रोजच सारंच शिकवण, दुपारच्या सुट्टीत बाहेर एका रांगेत खिचडी खायला बसणं, मग ground वरती खेळायला जान, खूप आठवलं. सर वर्गात शिकवायला येत नाही तोपर्यंत एकमेकांच्या खूप खोड्या करायचो आम्ही. मग सर यायचे वर्गात आणि सर्वात पहिले homework check करायचे. पण एकाचा पण homework complete नसायचा. मग काय एका रांगेन सर सर्व मुलांना खूप मारायचे. मग काय सांगता दुसऱ्या दिवशी सगळ्यांचे homework direct complete. खूप हसायला पण यायचं. आमच्या वर्गात एक दिपाली नावाची मुलगी होती आणि उमेश नावाचा एक मुलगा होता. ते दोघं पण एकमेकांना खूप like करायचे. वर्गात सर शिकवत असताना पण ते एकमेकांना चोरून बघायचे. दिपलीला उमेश खूप आवडायचा. एकदा काय झालं ना आमच्याच वर्गातील एका मुलीने उमेशला पेन मागितला . आणि ते दिपालीला दिसल. मग काय सांगता ना राव झाली ना सुरू दोघींची भांडण . एकमेकींना खूप शिव्या पण दिल्या एकमेकींच्या वेण्या पण ओढल्या. 🤣🤣🤣😃😃😃
खूप भारी हसायला आलं होत मला तर . खूप आठवतात ते शाळेचे दिवस अजूनही. अस वाटल परत आपण लहान व्हावं आणि शाळेत जावं. खूप सुंदर आठवणी आहेत लहानपणच्या . असेच असतात प्रत्येेकाच्या आयुष्यातील शाळेचे दिवस....🤗🤗😊
Sapna patil ✍️✍️✍️
Wednesday, October 6, 2021
शाळेतील दिवस आठवले
Subscribe to:
Post Comments (Atom)
happy birthday sir
पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...
-
तू हवा होतास आयुष्यात आजही सोबत माझ्या खूप जपलं असतं तुला श्वासातील स्पंदनात माझ्या जपता जपता तुला समजावून ही घेतल असतं फुलासारखं तुला माझ्...
-
पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...
-
चल ना जाऊ आपण त्या पॅलेस हॉटेलवर घेऊ आपण फक्त कॉफी आपल्या पाहिले भेटीवर तुझ्यासोबत कॉफी घेताना खूप आवडतं मला बोलायचं असतं बरच काही पण कसं ब...
No comments:
Post a Comment