सांजवेळी मन बहरून आले
फुले ओंजळीत घेऊनी
मन प्रसन्न झाले
मन प्रसन्न होऊनी
अंग शहारले
अंग शहरूनी मन
काहूर काहूर झाले....
सांजवेळी मन बहरून आले
थंडगार वारे वाहून गेले
नभात चंद्र चांदण्यांचे
ठसे उमटले
ठसे उमटूनी मन
काहूर काहूर झाले
सांजवेळी मन बहरून आले....
Sapna patil ✍️
No comments:
Post a Comment