समाज घातक
स्वतःच जीवन जगताना समाजाच्या दृष्टीने जीवन जगावे लागते. असे केलं तर समाज काय म्हणेल तसा केलं तर समाज काय म्हणेल. आपण काही वेगल राहील तर समाज काय म्हणेल. समाज पायी पण चालू देत नाही आणि घोड्यावर पण बसू देत नाही. मग आपण केव्हा जगायचं . समाजाच्या नादाला लागून आपण आपल्या च इच्छांना मारायचं का. एखादी स्त्री घराबाहेर पडते तेव्हा तिच्या कडे बघण्याचा हा समाजाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जातो.
तेव्हा तिच्याकडे हा समाज वाईट नजरेने बघतो. आणि जो पर्यंत ती एका घराच्या कोपऱ्यात गुलामगिरीत बसून असते तिला हा समाज चांगलं म्हणतो. मग अस करतो हा समाज. तिच्या इच्छा असतात. तिला पण मन आहे. तिला पण मोकळा श्वास घ्यायचा असतो. मग का हा समाज तिला स्त्री म्हणून हिनवतो.. का ती एक स्त्री आहे म्हणून तिला आठवण करून देतो. कोण आहे हा समाज आपल्या स्वतःच्या आयुष्यात भाग घेणारा. साध्या मनाने राहील तरी म्हणतात साधी आहे. ताठ मानेने चालेल तरी म्हणतात शिष्ट आहे. एखाद्या मुलासोबत बोललो तर मग तर वाया गेलेली आहे. मग मुलींनी या समजत बागवे तरी कसे हेच काळात नाही. घेऊ द्या ना आम्हाला पण उंच भरारी त्या आकाशातील पक्षाप्रमाणे. घेऊ द्या आम्हाला पण तो मोकळा श्वास. का आम्ही एक स्त्री आहे म्हणून गुलामगिरीत राहायला हवे का . तास राहील तर समाजाला मान्य आहे. एखादी स्त्री जर का काही करायला लागली तर हाच समाज तिचे पाय मागे खेचतो. एखाद्या स्त्रीला जर तिचा नवरा त्रास देत असेल आणि ती मुलगी दुसऱ्या एखाद्या मुळासोबत तीच स्वप्न रंगत करत असेल तर तेव्हा पण हाच समाज तिला आडवा येतो. आणि ती मुलगी अशीच आयुष्यभर मर मर करत राहते. काय अधिकार आहे या समाजाला आम्हा स्त्रियांना हीनवण्याचा. या समाजाचा विचार करत बसले तर आयुष्य जगायचं ह राहून जाईल. आणि या सगळ्या कारणांनी च आपला भारत देश मागे राहिलाय... आणि इतर देशांनी चांगली उन्नती केली आहे. जो पर्यंत हे मागासलेले विचार बदलणार नाही तोपर्यंत असच आयुष्य जगावं लागणार आहे..... असा हा समाज आपल्यासाठी घातक आहे....
Sapna patil....✍✍✍
सुंदर शब्दांत स्त्रीच्या मनाची घुसमट मांडली...वास्तव लिहिले.✍️������
ReplyDeleteस्री मनाची व्यथा छान मांडली आहे सखी 👌👌👌
ReplyDelete