सारे काही सोडून...
एक दिवस सगळ काही सोडून जायचच असते....
तो दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात येणारच असतो....
हे माहीत असूनसुद्धा हा माणूस स्वार्थी मनाने का जगतो....
काहीच आपल नसते तरीही काही ना काही मिळवण्याच्या अपेक्षा का ठेवतो....
त्या अपेक्षांच्या पाठीमागं लागून का त्याच्या दुखाच कारण ठरतो....
एक दिवस तर सगळ काही सोडून जायचच असते....
जे मिळालंय त्यात सुख कधी मानतच नसतो....
आणि जे पाहिजे त्या अपेक्षांच्या पाठीमागं लागत असतो....
हे माहीत असून सुद्धा एक दिवस हे सगळ सोडून जायचच आहे तरीपण सर्व काही माझ माझं आहे अस म्हणत असतो....
काहीच सोबत घेऊन जात नसतो....
सर्व काही मिळवलेले इथंच सोडून जातो....
आणि सोडून जातो ते फक्त कुणाशी बोललेल गोड शब्द.....
आणि हेच तो सोबत घेऊन जातो.....
एक दिवसात सर्व काही मिळवलेले सोडून जायचच आहे हे तो विसरूनच जातो......
अतिशय सुंदर लेखन केले सखी ✍️��
ReplyDeleteभाव चिंतन लेखन!✍️👌👌👌
ReplyDelete