एक मागू तुझ्याकडे शेवटचं
खूप मदत केलीस तू माझी
पण शेवटची एक मदत करशील तू माझी
बघ ना किती प्रयत्न केले
तुला विसरण्यासाठी
पण तू नाही जात आहेस या मनातून
बघ ना तुला मनातून काढण्यासाठी
किती प्रयत्न केले
रडता रडता या डोळ्यातील
अश्रूच संपून गेले
बघ ना तुला माझ्या तून आता
दूर पण केलं जातं नाहीय
बघ ना आता सहज हे जग
सोडून पण जाता येत नाहीय
आता तू नाही, तुझ्या आठवणी
सोबत भांडायचे आहे
आता या श्वसाला पण अजून
जगायचं नाही आहे
तरी शेवटची एक मदत
तू मला करून जा
ऐक ना रे....
सांग ना एकदा मला प्रेमाने
तू माझ्या आयुष्यातून निघून
तिकडेच मरून जा
तिकडेच मरून जा.....😢😢
No comments:
Post a Comment