Monday, October 31, 2022

भावना मनाच्या

शब्द काळजातले
ओळी प्रेमाच्या
क्षणात तुटल्या त्या
भावना मनाच्या

गात मंजुळ गाणी
अन् कविता प्रेमाच्या
क्षणात वहिल्या त्या
भावना मनाच्या

गीत रानातले अन्
तारा स्वरांच्या
क्षणात विरघळल्या त्या
भावना मनाच्या

अंधुक झाल्या
वाटा प्रेमाच्या
विरहात गेल्या त्या 
भावना मनाच्या


सत्य परिस्थिती

गावकरी : काय रे गावच्या यात्रेला येतोस का गावी?

नोकरीवाला : नाय हो! रजा जास्त झाल्यात पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! होळीला येतोयस का गावी? 

नोकरीवाला : पोरांना सुट्टी नाय हो! उगीच शाळा कशाला बुडवायची.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! दसऱ्याला येतोयस का गावी?

नोकरीवाला : नाय हो! तब्येत बरी नाय नाय जमणार.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! दिवाळीला येतोयस का गावी?

नोकरीवाला : आलो असतो पण ऑफिस मध्ये एकटाच आहे.

😩😩😩😩😩😩😩  
गावकरी : काय रे! या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही?

नोकरीवाला : आई-बाबा आहेत ना ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : अरे! त्या दिवशी मयतावर आलास नाही?

नोकरीवाला : निघालो होतो पण ट्रॅफिक इतकी होती की, मौत भेटलीच नसती.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : अरे! यंदा आवणीला येशील ना?

नोकरीवाला : साहेबानी सांगितलय, रविवारी पण कामावर यायला लागेल.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी (फोनवरुन) :
अरे! ऐकलस, काय !  तुमच्या जमीनीवरुन रेल्वे जातआहे रेल्वेमध्ये गेलेल्या जमिनींच्या नोटीसा आल्यात, पंधरा दिवसात पैसे भेटणार आहेत पण तुझी सही साठी यायला जमेल काय तुला ?  तुझा दादा पण यायला निघालाय?

नोकरीवाला :
दहा मिनिटांत ऑफिस मधुन निघतो, एकटाच आलो तर चालेल का सगळे येऊत! दादाला सांगा दोन तासात पोहोचतो आणि हो मोठ्या बाबांना विचारा घरी येऊ का ?  डायरेक्ट तहसील ऑफिसला येऊ. वाटल्यास मी पंधरा दिवसाची रजा टाकूनच येतो?  पुर्ण काम झाल्यावरच परत जाईल..
      😭😄😂😱😇
     ❓❓❓❓❓

'विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण ही आजची सत्य परिस्थिती आहे.'

लोकांमध्ये  Professionalism आणि स्वार्थ इतका वाढलाय की आपलं गाव, गावपण, जुन्या रीती, भुतकाळ, परंपरा गुंडाळून ठेवल्या जात आहेत.

जरूर विचार करा आणि बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करुया 🙏


कोणाला आवडले नसेल तरी हरकत नाही कोणी like करणार नाही तरी हरकत नाही पण सत्य परिस्थिती आहे ही आजची 🙏🙏🙏🙏

copied


अविस्मरणीय क्षण

असे काही क्षण 
आयुष्यात माझ्या येऊन गेले
खूप प्रयत्न केला विसरण्याचा 
पण ते अविस्मरणीय होऊन गेले

कसे विसरू त्या क्षणाना
ते क्षण तर मनातच राहून गेले
स्तब्ध होऊन गेल्या सर्व भावना
पण ते क्षण मात्र अविस्मरणीय होऊन गेले


अविस्मरणीय सौंदर्य

इतकं मनमोहक सौंदर्य आहे तुझं 
की त्याला कशाचीच जोड नाही
चंद्र, सूर्य, तारे सर्व ग्रह देतात
तुझ्या अविस्मरणीय सौंदर्याची ग्वाही...


मनाची खिडकी

माझ्या मनाच्या खिडकीत 
तुला मी बसवलंय
अंतरंगात माझ्या
फक्त तुझच नाव कोरलय

माझ्या मनाच्या खिडकीचे दरवाजे 
तुझ्यासाठी कायम उघडे आहेत
तू फक्त ये आणि डोकावून बघ आतमध्ये
सर्व दूर फक्त तुझेच पारडे आहेत

माझ्या मनाच्या खिडकीत
फक्त तुझच नाव कोरलयं मी
तू फक्त माझीच रहा 
कवितेत माझ्या फक्त तुलाच लिहिलंय मी

माझ्या मनाची खिडकीत
तू उभी आहेस चहाचा कप घेऊन
मी फक्त तुलाच बघत राहतो
तुझा हात हातात घेऊन

परके

माझ्या मनाच्या खिडकीचे दरवाजे
नेहमी तुझ्यासाठी उघडे आहेत
तू फक्त माझी आहेस 
बाकी सगळे परके आहेत...


रूप तुझे देवा

रुप तुझे पाहता देवा
होई समाधान
अविस्मरणीय रूप तुझे
मन उडे आनंदान

मंत्रमुग्ध होते माझे
तन मन ध्यान
विठू नामाचा गजर होई
पायी वाजती पैजण

भक्ती तुझी करिता देवा
मन होई रे तल्लीन
मोर थुई थुई नाचे
नाचे आनंदान


Diwali

पहिला सारखी सर आते दिवाई ले येस नही,
मामानं गाव कायशे, आते याद कोणले येस नही !!१!!

मोबाईल ना जमानामा पोरे भलता रमी ग्यात,
नातं गोतं काय शे भाऊ, ते सुद्धा इसरी ग्यात !!२!!

मामानं गावले जावाना आमले भलता नांद ऱ्हाये,
खिसामा दमडी नही आन, चड्डीले आमनं ठिगय ऱ्हाये!!३!!

काय सांगू त्या सुरत भुसावल रेल्वे ना दिन,
एक रुप्यानी पुडी साठे, मायले मारणी पडे पिन !!४!!

आते दिवाईनी फराय ना लाडू नही गोड,
आते म्हणस का दादा कोणी, चाल माले ठेसन ले सोड !!५!!

मायाबहीनिसले सासरवास व्हता म्हणून माहेरना तिसले व्हडा व्हता,
दिवाइले परतानी वखत, मायबाप ना भलता लळा व्हता !!६!!

दिवाई करी परताना टाइम ये डोयान्या धारी लागेत,
तवय खावाले नही व्हत भाऊ त्या दोन चार शंकरपाया भी भलता आमले भारी लागेत !! ७!!

आमले दिवाई ना कपडासनी भलती मोठी आस ऱ्हाये,
त्या पैसासवर एक महिना घर भागी जाई, हाई मायले आस ऱ्हाये !!८!!

काय त्या दिन माय माऊली ना कपाशी येचाना हाल ऱ्हाये,
सुट्टी कव लागी आणि कपाशी कव उलगी 
हाई आमना मन मा मोठी चाल ऱ्हाये!!९!!

जमाना बदली ग्या, मानस भी बदली गयात,
ना ऱ्हाईनी ती दिवाई, ना त्या मानसं हयात !!१०!!


copied....


happy diwali 🎊

संपू दे अंधार सारा
उजळू दे दाही दिशा
गांधळल्या रात्रीची
दिसू दे प्रकाशाची आशा....

नव्या पहाटेची 
पडू दे नवी किरणे
उजळू दे भविष्याच्या दिशा
बघू दे नव्या पहाटेची स्वप्ने...

संपू दे द्वेष सारा
नव्या नवतीचा
नवा मार्ग दिसू दे 
मिटू दे अंधार सारा
इंद्रधनुष्याचे सप्तरंग 
नव्याने उधळू दे....

जीवसृष्टीने जन्म घ्यावा
मोकळा श्वास तू घेऊ दे
स्पंदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळू दे.....

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या....


मन माझे झुलते

मन माझे झुलते 
आशेच्या हिंदोळ्यावर
तुला पाहता हास्य उमटते 
या प्राजक्ताच्या फुलावर


हॅप्पी भावबिज

थोडंसं मधाळ तर थोडंसं खट्याळ
असं एक नातं असतं स्वप्नातलं
क्षितिजा पल्याड लपलेलं
एकमेकांची मनं जपलेलं
कोवळ्या पाकळीत रुजलेलं
बंधनानी सजलेलं....
एकाच जीवतून आलेलं
नातं असतं ते बहीण भवाचं

 सर्व भावांना भवबिज च्या लक्ष लक्ष शुभेच्छा....💐💐💐🍫🍫

क्रोध

क्रोधाचे परिणाम 
खूप वाईट होतात
मग आयुष्यभर 
पश्र्चाताप करतात...

कधी कधी क्रोध हा
खूपच होऊन जातो
आपल्याच लोकांना 
दूर घेऊन जातो


रोज नवे भास तुझे

   रोज नवे भास तुझे व्हावे
         स्वप्नांच्या दुनियेत तू मज घेऊन जावे
            सत्य आहे की स्वप्न मज न कळावे
           कोवळे मन माझे वाऱ्यावर झुलावे
         निसर्गाची निरव शांततेने स्पर्श करावा
             तो स्पर्श ही मज तुझा भासावा
                  मंद वाऱ्याची झुळूक
               अन् खळखळनारं पाणी
        सुंदर असं दृश्य डोळ्यात मी साठवावं
   ते निर्मळ दृश्य बघता मी त्यात पूर्ण गुंतून जावं
      तू खूप जवळ यावं.... असच मला वाटावं


भास तुझे...हायकू

                        रोज होतात 
                     भास तुझे रे मला
                        कळेना तुला
             ......................................
                         होतात मज
                      भास गोड ते नवे
                        तुझ्याच सवे
           .........................................
                        दिसते मला
                     ते प्रतिबिंब तुझे
                       ते भास माझे
          ..........................................


वी. स. खांडेकर

*वि. स. खांडेकर*
माणसाने विझलेले दिवे सुध्दा पहायचे असतात, मग तेजाळणा-या दिव्याची महती समजते. तेजाच्या वलयाची जाणीव होते. दिवे जळून विझले की त्यांची असहाय्यता समजते. ते का विझले असावेत? याचा अंदाज घेता येतो. विझलेल्या दिव्यांची वेदना समजून घेता येते. आपण जेव्हा वेदनेच्या परिछायेत असू त्यावेळची जाणीव होते. आणि तसं पाहिले तर प्रत्येक दिव्याला विझावचं लागतं. कधी वेळ आल्यावर तर कधी अवेळी पण. दिवे जेव्हा प्रकाशमान असतात तेव्हा प्रत्येकाला ते आवडतात. पण याचा अर्थ असा नाही की अंधार उपयोगी नसतो. अंधार पण वेदनेला पोटात जागा देतो. आसवं मुक्तपणे ओघळू देण्यासाठी अंधाराएवढी सुरक्षित जागा कोणतीही नाही. अंधार आहे म्हणून प्रकाशाला किंमत आहे. वेदना आहे म्हणून आनंदाला महत्व आहे. प्रकाश हा अंधारातून जन्म घेतो. म्हणून *विझलेला दिवासुध्दा आपण पहायलाच हवा तरच तेजोमय दिव्याचे महत्त्व कळेल.*


copied


तुझ्यात जीव गुंतला

किती रे तुझी आठवण 
मला खूप सतावत आहे
या भिजलेल्या मनाला 
अजूनच भिजवत आहे
वेडापिसा झालाय जीव माझा
तो तुझ्यातच गुंतत आहे
कशी सावरू त्याला
त्याचा तर बांधच फुटत आहे
ओलेचिंब डोळे माझे
संकेत ते देत आहे
या भिजलेल्या मनाला
अजूनच ते भिजवत आहे


जीव गुंतला...हायकू

गुंतला जीव
सख्या तुझा माझ्यात
धुंद प्रेमात

गुंतला जीव
वेडापिसा रे झाला
सावर त्याला

वेड्या प्रेमात
जीव त्याचा गुंतला
भान हरला....


पंख

                                      छाटले जरी पंख माझे
                                      श्वासात बळ आहे
                                      घेईल पुन्हा गगनभरारी
                                      पंखात जिद्द आहे
तलवारीचे घाव मिटले
शब्दांचे घाव तसेच आहे
शब्द शब्द म्हणता म्हणता 
जीव माझा तळमळत आहे
                                 येतील आयुष्यात खूप सारे
                                 गेले ते ही येणारच आहे
                                 झाले गेले सर्व विसरा
                                 भविष्य एकदा बदलणारंच आहे


मंजुळ गाणी गाताना

सरी रिमझिम पाऊस झरताना
ऋतू गंध मनी दरवळताना
वाऱ्याची मंजुळ गाणी गाताना
सखे याद यावी का तुझी

गीत प्रितीचे गुनगुनतांना 
सप्तरंग ते बघताना
सूर तालावर ते छेडताना
सखे याद यावी का तुझी 

पाने वाऱ्यावरती डोलतांना
हर्ष मनी माझ्या होताना
मी प्रेम कविता वेचताना
सखे याद यावी का तुझी

हा थंड गारवा झोंबताना
मनी अंग शहारे येताना
डिंपल गालात पडताना
सखे याद यावी का तुझी

सखे तुझ्यात मी रमताना
तू हृदयी जवळी असताना
नजरेत तुझ्या मी बघताना
सखे स्वप्ने मी ग बघतो तुझी....


Friday, October 21, 2022

जीवनाचा प्रवास


लाभावी तुझीच साथ आयुष्यभर 
जगताना सुख दुःखाच्या वाटेवर
जीवनाचा हा प्रवास असावा नेहमी
स्वामी तुमच्याच आशिर्वादावर  

येतील वादळे येतील तुफान
जगायचंय मला त्या आशेच्या किरणांवर
जीवन प्रवास निष्पन्न व्हावा माझा
फक्त स्वामी तुमच्या चरणांवर

जीवनाच्या प्रवासात नेहमी 
सहवास तुझाच असावा
सांभाळून घेईल मी सर्व
फक्त मार्ग तुझाच असावा

येतील संकट खूप जीवनात
त्यांना सामोरं जायचयं मला
फक्त तू माझी रहा
खूप जपून ठेवायचंय तुला


Thursday, October 20, 2022

एकाकी जीवन

एकाकी जीवन जगताना
आयुष्याच्या सर्व वाटा बंद होऊन जातात
मग डोळ्यांच्या पापण्याही ओल्या होऊन सांगतात
साथ कुणाची नाही एकटा आलाय एकटाच जाशील
असं एकवटलेल्या मनाला ओरडुन ओरडुन सांगतात
एकटेपणाची जाणीव करून देतात....
आयुष्यातील काही क्षण
सुखाच्या वाटेवर दुःखाची वाट घेऊन येतात
आपल्याला एकटेपणाची जाणीव करून देतात
खूप अवघड असतं हे एकाकी जीवन जगणं
काही लोकं आयुष्यात काही क्षणापुरते येतात
तर लगेच दूर निघून जातात....
शेवटपर्यंत एकटेपणाची खंत मनात देऊन जातात....

......................................................

किती सावरावं स्वतःला 
किती सांगड घालावी मनाला
आवरत नाही आता भावना
अर्थ नाही राहिला जीवनाला....
....................................................


Wednesday, October 19, 2022

व्यथा मनाची 2

आज खूप रडावसं वाटतंय
डोळे अभाळसारखे भरून आलेत
मनातील वादळ उरफाटून आलंय
नभातील चांदणं नाहीसं झालय
डोळ्यांचे काठ भरधाव पावसाचा संकेत देत आहेत
कोणत्याही क्षणी पाझर फुटेल आणि
डोळ्यातून वाहणाऱ्या आसवांचा पूर वाहून येईल....
असं वाटतंय जावं त्या भरधाव घेणाऱ्या पावसात
आणि वाहून टाकावं स्वतःला त्या सागराच्या उसळणाऱ्या
लाटांसारखं.....
कसं समजावू या डोळ्यांच्या पापणीला
ती तर भरल्या नभासारखी भरून आलीय....
आयुष्यात पुन्हा एकदा एकांत घेऊन आलीय....
मनातील वादळ थांबायचं नावच घेत नाहीय...
कसं थांबवायचं या वादळाला या मनाला ही कळत नाहीय...
.............................................................
कुठं रितं करावं या आसवांना....
वहीच्या कोऱ्या कागदावर .....
की कवितेच्या सुंदर ओळींवर....
कुणाच्या मनावर
की स्वतःच्याच नशिबावर....
कुठं तरी दूर निघून गेल्यावर.....
की कुणाच्या निघून गेलेल्या आठवणींवर....
निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर
की कुणाच्या कुशीत निजल्यावर.....
चार चौघांच्या खांद्यावर
की जावून रितं करावं आसवांना त्या रचलेल्या सरणावर...
.......................................
कशी येतात ना लोकं आयुष्यात
आणि काम संपलं की निघून जातात
मायेचा हात डोक्यावर ठेवून....
आपल्याला त्यांची सवय लावून जातात....
आपल्याला जिवापाड प्रेम देऊन
आणि आपल्याच जीवाला घोर लावून जातात.....
...............................................

स्वप्नमयी......


स्वार्थी व्यक्ती...लेख

गावकरी : काय रे गावच्या यात्रेला येतोस का गावी?

नोकरीवाला : नाय हो! रजा जास्त झाल्यात पहिल्या दिवशी येईल, नंतर जमेल असे वाटत नाही.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! होळीला येतोयस का गावी? 

नोकरीवाला : पोरांना सुट्टी नाय हो! उगीच शाळा कशाला बुडवायची.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! दसऱ्याला येतोयस का गावी?

नोकरीवाला : नाय हो! तब्येत बरी नाय नाय जमणार.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : काय रे! दिवाळीला येतोयस का गावी?

नोकरीवाला : आलो असतो पण ऑफिस मध्ये एकटाच आहे.

😩😩😩😩😩😩😩  

गावकरी : काय रे! या वर्षी कुणाच्याच लग्नाला आलास नाही?

नोकरीवाला : आई-बाबा आहेत ना ही पण म्हणाली सगळीच कशाला, मग नाही आलो.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : अरे! त्या दिवशी मयतावर आलास नाही?

नोकरीवाला : निघालो होतो पण ट्रॅफिक इतकी होती की, मौत भेटलीच नसती.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी : अरे! यंदा आवणीला येशील ना?

नोकरीवाला : साहेबानी सांगितलय, रविवारी पण कामावर यायला लागेल.

😩😩😩😩😩😩😩

गावकरी (फोनवरुन) :
अरे! ऐकलस, काय !  तुमच्या जमीनीवरुन रेल्वे जातआहे रेल्वेमध्ये गेलेल्या जमिनींच्या नोटीसा आल्यात, पंधरा दिवसात पैसे भेटणार आहेत पण तुझी सही साठी यायला जमेल काय तुला ?  तुझा दादा पण यायला निघालाय?

नोकरीवाला :
दहा मिनिटांत ऑफिस मधुन निघतो, एकटाच आलो तर चालेल का सगळे येऊत! दादाला सांगा दोन तासात पोहोचतो आणि हो मोठ्या बाबांना विचारा घरी येऊ का ?  डायरेक्ट तहसील ऑफिसला येऊ. वाटल्यास मी पंधरा दिवसाची रजा टाकूनच येतो?  पुर्ण काम झाल्यावरच परत जाईल..
      😭😄😂😱😇
     ❓❓❓❓❓

'विनोदाचा भाग बाजूला ठेवा पण ही आजची सत्य परिस्थिती आहे.'

लोकांमध्ये  Professionalism आणि स्वार्थ इतका वाढलाय की आपलं गाव, गावपण, जुन्या रीती, भुतकाळ, परंपरा गुंडाळून ठेवल्या जात आहेत.

जरूर विचार करा आणि बदल घडवुन आणण्यासाठी प्रयत्न करुया 🙏


कोणाला आवडले नसेल तरी हरकत नाही कोणी like करणार नाही तरी हरकत नाही पण सत्य परिस्थिती आहे ही आजची 🙏🙏🙏🙏

copied


believe nd trust

*एक अत्यंत सुंदर गोष्ट वाचनात आली भगवंता वरचा विश्वास कसा असायला हवा. त्याचे उत्तम उदाहरण वाटले म्हणून शेअर करत आहे*

*Believe-विश्वास*
*आणि*
*Trust-विश्वास*

*दोन्ही शब्दांचा अर्थ "विश्वासच" आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात अंतर आहे.*

*एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबल वरून या इमारती वरून त्या इमारतीवर जात होता.*
*त्याच्या खांद्यावर  त्याचा लहान मुलगा होता.*
*दोन इमारतींच्या मधे हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती.*
*हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केलं.*
*जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या, तोंड भरून कौतुक केले.*
*तो इमारतीच्या खाली लोकांमधे आला. लोक त्याच्या बरोबर फोटो. सेल्फी  काढू लागले. त्याचं अभिनंदन करू लागले.*
*तो डोंबारी सगळ्यांना उद्देशुन म्हणाला,*
*मला हे पुन्हा एकदा करावसं वाटतं. तुम्हाला विश्वास वाटतो का मी हे पुन्हा करू शकेन?*
*सगळी माणसं एक आवाजात म्हणाली हो, तू हे परत एकदा नक्कीच करू शकतोस.*
*डोंबारी म्हणाला "तुम्हाला विश्वास आहे ना, मी हे परत करू शकेन?*
*पुन्हा सगळे ओरडले  हो हो आम्हाला विश्वास आहे तू पुन्हा हे नक्कीच करू शकशील.*
*तुम्हाला नक्की विश्वास आहे ना?*
*हो. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू खात्रीने करू शकशील.*

*डोंबारी म्हणाला "ठीक आहे. तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमचा मुलगा द्या मी त्याला खांद्यावर  घेऊन मी या केबल वरून चालतो.*

*जमावा मधे एकदम शांतता पसरली. सगळे चिडीचूप झाले. डोंबारी म्हणाला काय झाले. घाबरलात का?*
*अरे आताच तर तूम्ही म्हणालात ना की माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून?*

*तात्पर्य :- जमावाने जो डोंबाऱ्यावर दाखवलेला विश्वास हा Belief आहे.*
*Trust  नाही.*

*तसेच हाच भ्रम सगळ्यांना आहे, परमेश्वर आहे. पण परमेश्वराच्या सत्तेवर विश्वास नाही.*

*You only belive in God, But you don't trust him.*
*परमेश्वरावर विश्वास असेल तर चिंता आणि ताण - तणाव कशाला हवेत.*
*त्याच्या नामाने दगड तरले तर आपण का नाही तरणार?*
*परमेश्वरावर ठाम विश्वास बसण्यासाठी आपण चमत्काराची वाट पाहत बसतो. पण खरा चमत्कार हाच आहे की रोज तो आपल्याला नवीन करकरीत कोरा दिवस देतो आणि आपल्या गत चुकांमधून शिकण्यासाठी आणि नवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी.*
*आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला आपला परमेश्वर आपल्या सोबत असतोच आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची खबर त्याला असतेच हा विश्वास असला तर आपल्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही.*

श्री स्वामी समर्थ .....🙏🏻🙏🏻🌹🌹
   
copied.....


माझी लाईफ बोट

माझ्या स्वप्नात रात्री येऊन गेलास तू
माझ्या हातात हात दिलास तू
स्वप्न रंगवले तुझ्यात मी
माझी लाईफ बोट चालवलीस तू

माझ्या स्वप्नात रात्री येऊन गेलास तू
चंद्राला साक्ष ठेवलस तू
आयुष्यभर सुखात ठेवील तुला
मला सात वचन देऊन गेलास तू

माझ्या स्वप्नात रात्री येवून गेलास तू
मला सुखाच्या वाटेवर नेलास तू
हा हात हातात घेतलाय कधीच 
सोडणार नाही
असे वचन मला दिलेस तू

...,.....................................
📚📚📚📚📚🌈🌈🌈🌈🌈🌈

आश्रय मजला
द्या स्वामीनाथा
कृपा असू द्या 
सर्वांवर

माझी लाईफ बोट 
स्वामी तुम्हीच चालवा
संसार होईल माझा
सुखाचा


स्वप्नमयी....

तुझी माझी रेशीमगाठ

रेशीमगाठ
बांधली विश्वासाने
अंतर्मनाने...

हायकू.....

तुझी माझी रेशीमगाठ
आयुष्यभराची साथ
दोघांनी मिळून करू
येणाऱ्या प्रत्येक संकटांवर मात.....

तुझी माझी रेशीमगाठ
सात जन्म सोबत राहू
सुख दुःखाचे नजारे
दोघांनी मिळून पाहू

तुझी माझी रेशीमगाठ
कधीच सुटायची नाही
संसाराचं गाळं असच
प्रेमाने चालत राही

तुझी माझी साथ
बांधली सात जन्माची गाठ
दोघांनी मिळून खेळू
संसाराचा सारिपाठ.....

रेशीमगाठी

तू आलीस माझ्या जीवनात
आपसूकच बांधल्या रेशीमगाठी
तुझी माझी साथ शेवटपर्यंत असावी
हीच देवाला प्रार्थना करतो आपल्या दोघांसाठी


Saturday, October 15, 2022

आनंद जीवनाचा

आनंद हा जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
गळ्यातला सुर जैसा ओठातून ओघळवा
दवबिंदूचा सळा चौफेर पसरावा
आनंद हा जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
सायंकाळ झाली असता 
पक्षांचा किलबिलाट व्हावा
रिमझिम पावसाने त्याचा प्रहार करावा
परखूनी पर्जन्यपारा सुगंध हा मातीस यावा
भिजल्या फुलातून जैसा.... दवबिंदू तो ओळखावा
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा


रामायणातील अनभिज्ञ प्रसंग

#रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला.
.
सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसहवर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरु झाली होती. सीतामाई येथूनच कांही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता; ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून आणण्याचे कार्य बाकी होते; शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्या अगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा असते. त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्यांचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले.

झाले, शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरु करण्यात आली. सगळी तयारी झाली पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा विचार करून त्यांनी ह्या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलाविण्याचा निश्चय केला. रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे तर प्रखर शिवभक्त, प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासकसुद्धा होता. म्हणून श्री रामाने हनुमंताला आज्ञा केली तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेला जा आणि रावणाला ह्या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्याला दे.

रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही. रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते. पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचविण्यासाठी लंकेला वायुमार्गे प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले. ते गोंधळून गेले होते, त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी कां केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते.

मात्र रावणाने आपल्या प्रकांड पांडित्याचा, देवपूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्याच्या परम भक्तीचा मान ठेवत रामाचे, आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामांकडे वळून म्हणाला, "हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस कारण ही प्रतिष्ठापना पती-पत्नी यांनी एकत्र करायची असते. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही."

आता सभोवती असलेल्या लोकांचे लक्ष श्रीराम ह्यावर काय उत्तर देतात ह्याकडे लागले - राम काय उत्तर देणार ह्यावर?
अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले, "पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौरोहित्य तुला दिलेले आहे. आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस. तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे.

ह्या दोन अतिशय थोर आणि उदात्त अशा राजांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वान सुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता. रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, "हे रामा, मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचावीतही आहे कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करू शकला नाही असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला ह्या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे, पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत घेणार नाहीस."

ह्या दोघांमधील संवाद ऐकणारे आसपासचे सारे लोक चकित होऊन त्यांच्यातील धर्मसंवाद ऐकत होते आणि दोघेही एकमेकांना पुरून उरणारी शास्त्रचर्चा न्याहाळीत होते. आता रावणाच्या या प्रस्तावावर राम काय उत्तर देणार ह्याकडे ते सारे उत्कंठेने पाहू लागले. रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपला पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उरकून घेतला. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम-सीतेला "विजयी भव" असा आशीर्वाद दिला. वास्तविक ह्याचा अर्थ युद्ध झालंच तर ह्या आशीर्वादाने रावणाने स्वतःचा विनाश स्वतःच स्वीकार करणे हा होतो हे माहित असूनही रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथेच स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते. आता एकच औपचारिकता शिल्लक उरलेली होती ती म्हंणजे पुरोहितांचा सन्मान.

रामाने रावणालाच विचारले," रावणा, पूजाविधी यथासांग पार पडला. आता आपण आपली दक्षिणा सांगावी." आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता. आजपर्यंत रावणाने कुणाकडूनही अगदी रामाकडूनही कांहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होता. त्याने कुणाकडून कांही दक्षिणा स्वकारण्याचा प्रश्नच नव्हता. पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला होता. दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला,"हे रामा तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एव्हढीच मागणी करतो की माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निध असावेस. या व्यतिरिक्त मला अन्य कांहीही नको."

आणि म्हणूनच रावणाचा, युद्धात श्रीरामांच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढवला तेव्हा श्रीराम रावणाच्या सन्निध उभे होते. भगवंताच्या सान्निध्यात मृत्यू येणे ह्या सारखे दुसरे पुण्य नाही. रावणाला हे माहित होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला होता!

.
ही गोष्ट फ़ार लोकांना माहिती आहे असे वाटत नाही, वाचनात आली म्हटले तुम्हाला देखील आवडेल वाचायला. ....


copied

भूतकाळातील प्रवास

कशी विसरू त्या 
भूतकाळातील भावनाना
जपून ठेवलंय मी
दर्दभऱ्या वेदनांना

खूप अवघड होता तो
भूतकाळातील प्रवास
तरीही गोड वाटत होता तो
कारण तुझा होता सहवास

भूतकाळातील साऱ्या आठवणी
पुस्तकात कैद झाल्या
वेदनांनी भरलेल्या आठवणी
मनातच राहून गेल्या

भूतकाळातील प्रवास
किती खडतर होता
साथ होती तुझी तरीही
काटेरी झुडूपाप्रमाणे होता


श्री स्वामी समर्थ

*🤞एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुसली आणि जाता जाता त्याला म्हणाली.... आता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार अाहे. परंतु मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत अाहे. तुझी इच्छा असेल ते माग.*

*🙏माणूस खूप समजूतदार होता, तो म्हणाला जर दारिद्र्य येणारंच असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, बस्स फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांत प्रेम आणि जिव्हाळा राहू दे.*

*🤞लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली.*

*👍काही दिवसानंतर - धाकटी सून स्वयंपाक बनवत होती, तिनं भाजीला मीठमसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली. त्यानंतर मोठी सून आली, न चाखताच मीठ टाकलं, आणि कामाला निघून गेली. त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाखताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या.*

*🤞जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला तर भाजी खारट लागल्यावर तो समजून गेला की दारिद्र्य आलेलं आहे. त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला.*

*🙏त्या नंतर मोठा मुलगा जेवायला बसला, तेव्हा खारट लागल्या नंतर विचारलं.. बाबांनी जेवण केलं का? तेव्हा बायकोनं हो म्हटलं. नंतर त्यानं विचार केला जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू? त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं.*

*🤞संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मी निघून चाललो आहे.*

*माणूस म्हणाला कां? दारिद्रय म्हणालं, तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठ खाल्लं राव 😅तरीपण भांडण केलं नाही. ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी 😊🤝 कमी झाली नाही, त्या घरात मी राहू शकत नाही.*

*👍लक्ष्यात ठेवा......*

*☝️भांडण आणि इर्षा यामुळं आपलं नुकसानच होतं. ज्या घरात प्रेम, शांती, आणि आपुलकी असते तिथं लक्ष्मी नेहमी नांदते...*

*🤞लेख माझा नाही पण छान आहे. कारण एवढच की  सर्वांपर्यंत चांगले विचार पोहोचवायचे.*
श्री स्वामी समर्थ....
     🙏🙏🙏🙏


चोर

चोरी ही कधीच करू नये
चोरी करणे पाप आहे
निसर्गाने दिलेला शाप आहे

चोर चोरी करतो 
काहीतरी सुराग राहूच देतो
एक दिवस नक्कीच सापडतो


Friday, October 14, 2022

धर्मवीर.... संभाजी राजे

संभाजी राजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले. शिवाजी महाराजांचे संभाजी राजेंवर अपार प्रेम होते. नशीबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले. संभाजी राजे दोन वर्षांचे असताना सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केली. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसाद केले.

छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजी राजेंनाही सोबत घेतले होते. त्यावेळी संभाजी राजे अवघ्या नऊ वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते. संभाजी राजेंवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजी राजेंचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली. त्यानंतर २० नोव्हेंबर १६६६ रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोहोचले. आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजी राजेंनी केलेल्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत.


चौदाव्या वर्षी बुधभूषण

छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. याशिवाय गागाभट्टांकडून नीतिपर 'समयनय' हा ग्रंथ संभाजी राजेंनी लिहून घेतला. 'धर्म कल्पलता' हा धर्मशास्त्रावरील गंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषांवरील प्रभुत्व, धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो.


कुशल संघटक

छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपूण होते. ते कुशल संघटक होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत, पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांची नियुक्ती करण्यात आली होती. 'श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||', अशी छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांची मुद्रा होती.

अजिंक्य संभाजी राजे
छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्याजोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता.

बुऱ्हाणपूर आणि रामशेज
छत्रपती शिवरायांनंतर शंभूराजे छत्रपती झाले. संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. मोठ्या फौजफाट्यासह मराठी सैन्य ७० मैलाची मजल मारून एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले. तीन दिवसापर्यंत मराठे लुट करत होते. जडजवाहीर, सोने-नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले. इतर जिन्नसाकडे त्यांनी लक्षही दिले नाही. भांडीकुंडी, काचेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेली वस्त्रे आदी सर्व लूट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून मराठ्यांचे सैन्य निघून गेले. संभाजी महाराजांच्या दराऱ्यामुळे पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कुणाची हिंमत झाली नाही, अशी आख्यायिका आहे. शहाबुद्दीन फिरोजजंगने रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला. हा किल्ला सहज हस्तगत करता येईल, अशी मोघलांचा समज होता. मात्र, संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी खास तुकडी तैनात केली. मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला ५ वर्षे झुंजवत ठेवला होता.

उदार धार्मिक लोकनीति
छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजी राजेंनी पुढे चालू ठेवले. अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरूष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या. संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास वर्षासन दिले. तसेच मौनी गोसावी, गणीराम, वासुदेव गोसावी, कऱ्हाडचे वेदशास्त्री नरसीभट शेषभट मुंज्येमणी, कांदळगावचे अनंत भट, महादेव भट, महाबळेश्वरचे वेदमूर्ती राम भट, कऱ्हाडचेच शिवभट नीलकंठभट अग्निहोत्री, पावसचे हरिभट पटवर्धन, रामचंद्र केशवभट पंडित, निंब येथील सदानंद मठाचे अनंतगिरी गोसावी यांना सढळ हस्ते मदत केली. त्यांच्या व्यवस्था लावल्या. संभाजीराजांनी चिंचवड, मोरगाव, सज्जनगड, चाफळ, शिंगणवाडी, महाबळेश्वर इ. देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालावे, यासाठी पूर्वीची वृत्ती, इनामे व सनदा पूर्ववत केल्या. एकूण धार्मिक कारभाराकडे ते जातीने लक्ष घालत असत, हे तत्कालीन पत्रव्यवहारांतून दिसते.

हौतात्म्यामुळे अजरामर झालेले पराक्रमी पुरूष
१६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे ४० दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.

  copied....

अधुरी प्रेम कहाणी

सुखाच्या वाटेवर जाताना
यावी एक सुंदर परी माझ्या जीवनी
स्वप्न ती सारी रंगवेल मी पण
अधुरी ना राहो तुझी माझी कहाणी 

तेरी मेरी प्रेम कहाणी
तू यावं माझ्या जीवनी
हरवून जावं मी 
तुला पाहताक्षणी


चंद्रमुखी

लावुनी चंद्राची कोर
झाला सर्व घोळ
केला तो काळजावर वार
चंद्रमुखीने

घालुनी नथनी नाकात
धडधड झाली काळजात
पडलो मी मोहात
चंद्रमुखीच्या

ओठांवर लाली
कानात बाली
नजर ती खिळली
चंद्रमुखीवर

नेसूनी येवला पैठणी
साज शृंगार लेवूनी
झाली मृगनयनी
ती चंद्रमुखी

घातले पैजण पायात
डौलात आली तोऱ्यात
छमछम घुंगरू वाजत
ती चंद्रमुखी

Sunday, October 9, 2022

resected sir

सुरेख मन त्यांचं
आणि त्यात आहेत आपण सर्व
नम्रता आहे त्यांच्या बोलण्यात
कोणत्याच गोष्टींचं नाही त्यांना गर्व....

कधी खूप राग तर 
कधी असते ओठांवर स्मित हास्य त्यांच्या
कधी हळवं मन तर कधी 
डोळ्यात असते प्रेमळ माया त्यांच्या....

स्वतः वरचा विश्वास
अदृढ आहे त्यांचा.....
अशक्यालही शक्य करेल
हाच ध्यास आहे त्यांचा.....

प्राजक्ताचं फुलही बहरून येईल
नभातील आभाळ ही वाहून जाईल....
असं व्यक्तिमत्त्व आहे त्यांचं की,
सोसाट्याच्या वारा ही स्तब्ध होऊन जाईल...

वाटलं मनाला माझ्या
याच व्यक्तिमत्वावर कधी
लेखणी माझी चालवावी
आज ती वेळ चालून आली 
आयुष्यात माझ्या
ती ओळ कोऱ्या कागदावर मी उतरावी 
अन् कवितेला माझ्या हळुवार पालवी फुटावी....
अन् कवितेला माझ्या हळुवार पालवी फुटावी....




Saturday, October 8, 2022

शक्तीशाली शस्त्र

शक्तिशाली शस्त्र
धारदार ते टोक
एकच वार केल्यास
पडते काळजाला भोक

शक्तिशाली शस्त्र ते
वापरावे त्याला जपून
रहस्य त्याचे खूप मोठे
काढते हृदय ही चिरडून

शक्तिशाली शस्त्र ते
होते शिवरायांच्या हातात
अनेक गड किल्ले जिंकून
स्वराज्य घेतलं आपल्या ताब्यात


अपूर्ण इच्छा

तिच्या स्वप्नांचा
गरीबी करे पिच्छा
अपूर्ण इच्छा

स्वप्न पाहिलं
अपूर्णच राहिलं
आयुष्यात ते

स्वप्नांना पंख
मिळाल्या त्या शुभेच्छा
अपूर्ण इच्छा


गणपती बाप्पा मोरया

आज आलेत बाप्पा आमच्या घरी
करूया बाप्पांच्या स्वागताची तयारी...❤️❤️🌹🌹

ढोल ताशे वाजतील जोमाने
आपण सर्व नाचू आनंदाने....🙏🏻🌹🌹

विघ्नहर्ता पालनकर्ता तू गणराया
भक्तिभावाने पडू तुझ्या रे पाया.....🙏🏻🌹🌹

किती देवा तू संकट हारिसी
त्या संकटातूनी आम्हा तारिसी......🙏🏻🌹🌹

करता करविता तूच गणेशा
बदलव रे बाप्पा तूच आता 
या गरीबाची दशा....🙏🏻🌹🌹🌹

गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या.....🙏🏻🌹🌹🌹

अपमानाचा बदला

भर रस्त्यात भर चौकात सगळ्यांसमोर त्याने तिच्या कानाखाली ओढली. तिला खूप अपमानास्पद वाटायला लागलं. मग तिने त्या अपमानाचा बदला घ्यायचं ठरवलं. 
तिने काही गुंडांना त्याची सुपारी देऊन त्याचे हातपाय तोडायला सांगितले. आणि त्याचा फोटो त्यांना दिला.दुसऱ्या दिवशी लगेच त्या गुंडांनी त्याला सुनसान सडक पाहून गाठलं. आणि त्याला बेदाम मारहाण केली. आणि त्या मारहाणीत त्याला अवघड जागेवर मार बसल्यामुळे त्याचा तिथंच मृत्यू झाला. 


म्हणून असा पण बदला घेऊ नये की त्यात कुणाचं जीव जाईल..


स्वाभिमानी बाबासाहेब

वाघाच्या जातीचा 
पोलादी छातीचा....
स्वराज्य घडविणारा
फक्त माझा छत्रपती राजा होता....
स्वाभिमानाने जगून
सविधान लिहून 
अख्या देशाला चालविणारा 
फक्त माझा बाबासाहेब होता...


अपूर्ण भेट

तिला आज कसही करून त्याला भेटायचं होतं... 
मनात लपलेल्या गुजगोष्टी ना उधळून टाकायचं होतं... तोडून टाकायच्या होत्या त्या विरहाच्या वाटा
शेवटचं एकदा तिला त्याचं व्हायचं होतं..... 
कधी भेटाव अन् मिठीत त्याच्या जावं
मन तिचं तिला नेहमी सांगत होतं....
कारण शेवटचं तिला एकदा त्याच व्हायचं होतं

पण कदाचित देवालाही मान्य नसेल
की ही वेळ तिच्या आयुष्यात यावी
तो सुवर्ण क्षण तिचा व्हावा
त्याला भेटण्यास आतुरलेली ती 
आणि काही क्षणांनी येणारी वेळ 
तिचं प्रायश्चित्त पाहत होती....
.
.
आता त्याला भेटण्यास निघालेली ती
.
.
काही क्षणात ती गतकालीन अवस्थेत पडलेली होती.
कारण देवालाही तिची अन् त्याची भेट मान्यच नव्हती.
.
.
असे विघ्न झाले कळताच 
त्याचे काळीज जळले
तसेच मध्यांतरित जावून
त्यानेही त्याने जीवन संपवले
.
.
.
............................अपूर्ण भेट

....✍🏻✍🏻

लॉटरी तुझ्या भक्तीची

वेळोवेळी समर्था
तुझीच गोडी असावी
अशीच लॉटरी मला 
जन्मोजन्मी लागावी

तुझ्या भक्तीची देवा 
लगूनिया आस
जन्मोजन्मी राहील 
समर्था तुझाच रे ध्यास

तुझ्या भक्तीत देवा 
होईल  मी तल्लीन 
सुखी ठेव सर्वांना
हेच मांगणं मागेन

..............✍🏻✍🏻

कसं विसरू तुला.... भक्तिभाव

कसं विसरू तुला
तूच आहेस भाग्यविधाता
तूच आहे करता करविता

क्षणोक्षणी सोबत तू असावा
कधीच देवा तुझा विसर न व्हावा

नमन करिते गुरू माऊलीला
भूल न कधी पडो या पामराला

असते तुझ्या समर्था मनात रे आस
तुझा विसर ना पडो जोपर्यंत माझा श्वास

कधी भुलले देवा तूज आठवण करून दे
वंदन करते तुला पदरात तुझ्या या लेकरास घे


पुन्हा एकदा भेटशील ना

पुन्हा नव्याने जगू आपण 
एकदा पुन्हा भेटशील ना

उभं आयुष्य करेल मी तुझ्यासाठी अर्पण
आयुष्यभर साथ देण्यासठी 
एकदा पुन्हा मला भेटशील ना

येतील रस्ते काटेरी आयुष्यात आपल्या
करेल मी संघर्ष तुझ्यासोबत जगण्यासाठी
म्हणून पुन्हा एकदा मला भेटशील ना

जशी फुले ओंजळीत अलगद ठेवावी
तसचं आयुष्यभर जपेल तुला
पण आयुष्यात पुन्हा एकदा मला भेटशील ना

जगण्यासाठी तुझी साथ हवी आहे मला
पडलेच मी खाली आयुष्यात कधी 
माझा हात धरण्यासाठी पुन्हा एकदा मला भेटशील ना

जपेल मी आयुष्याच्या शेवटच्या श्वासपर्यंत तुला
तूही मला सावरण्यासाठी आयुष्यात माझ्या
पुन्हा एकदा मला मिठीत तुझ्या घेशील ना
आयुष्यभर साथ देण्यासाठी पुन्हा एकदा भेटशील ना....


ती भयावह रात्र

ती अमावस्येची रात्र खूप भयावह होती. घराच्या चारही बाजूने कुत्रे भुंकत होते. रात्रीचे बारा वाजले होते.ती त्या दिवशी घरात एकटीच होती. तिला जाग आली. तेवढ्यापुरते डोळे उघडले. आणि परत लावून घेतले. तिच्या रूम जवळून कुणीतरी गेलं असा तिला भास झाला. तिने दचकून डोळे उघडले. आणि हळूच बेडवरून खाली उतरून दरवाज्याच्या दिशेने चालत चालत गेली. हळूच दार उघडलं. पण तिथं कुणीच नव्हतं. तिने सुटकेचा श्वास घेतला. भीतीने घसा कोरडा पडला होता ती पाणी प्यायला किचन मध्ये गेली. पाणी पीत असताना पुन्हा किचनच्या दारा जवळून कुणीतरी गेलं. पुन्हा ती घाबरली. आता तिला जास्तच भीती वाटायला लागली. तेवढ्यात मांजराच्या ओरडण्याचा आवाज आला. तिने पुन्हा सुटकेचा श्वास सोडला. .... .ती तिच्या बेडरूम मधे गेली. आणि बेड अंग टाकलं. झोपायच म्हटल तर एवढ्या वेळात तिच्या डोळ्यांची झोपच उडाली होती. आता तिच्या मनात विचारांचं काहूर माजलं होत. कोण असेल तो काय असेल ते की मला भास झाला. नाही पुन्हा पुन्हा भास कसा होणार. नक्कीच कुणीतरी आहे . मला बघायला हवं. ती लगेच उठते आणि हळूच दार उघडून बाहेर जाते पण तिला बाहेर कुणीच दिसत नाही. फक्त अंधार आणि सुनसान पडलेलं घर रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज.तेवढ्यात तिला घरातून कसला तरी हसण्याचा आवाज आला . आता ती पर घाबरून गेलेली. तिच्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या.आता तिला घरात जायची पण भीती वाटायला लागली. तरीही कशी तरी धाडस करून ती हळूच अलगद पावलांनी घरात शिरली. आणि समोर पाहते तर काय..... एक बाई पंख्याला उलटी टांगलेली. 😳😳 तिने पाहताक्षणी मोठ्याने किंचाळी मारली. आणि ती तिथच बेशुद्ध झाली. 

✍🏻


सावर रे मना

शब्द ओठांपर्यंत येतात 
अन् निशब्द होऊन जातात....
हृदय धडधडू लागते
अन् स्तब्ध होऊन जाते
काय समजावे या 
अबोल भावनाना
कसे समजावू या 
श्वासातील स्पंदनांना.....
न जाणे कशाची चाहूल 
मनाला घोर लावून जाते
आठवण तिची येताच 
मनात काहूर माजून येते...
अन् पुन्हा तिच ओढ लागते....
तिला बघण्याची.....
अबोल डोळ्यांनी 
सर्व काही व्यक्त करण्याची
सावर रे मना सावर.....

चार्ली चॅप्लिन

हसत चेहरा ठेवून 
मनातील दुःख लपवत असतो
भर पावसात भिजून
मी माझे अश्रू ढाळत असतो
लाख लपवतो मी दुःख माझे
पण जगाला मात्र खळखळून हसवतो

होतात वेदना मलाही
पण कुणाला दुःख सांगत नाही 
अल्लड मनाचा मी
कुणाचं हास्य हिरावून घेत नाही

चार्ली चॅप्लिन....


स्वप्न आई वडिलांचे

आईचे स्वप्न होते
माझा लेक कलेक्टर बनेल
नाव काढेल 
आई वडिलांचे

कष्ट करून 
शिक्षण पूर्ण केले
स्वतः उपाशी राहून 
मुलाला शिकविले
खूप हाल झाले
आई वडिलांचे

मुलाने स्वप्न पूर्ण केले
कष्ट चित्तास लागले
मन आनंदित झाले
आई वडिलांचे

स्वप्न

पाहीले स्वप्न
आकाशी उडण्याचे 
झेप घेण्याचे

पूर्ण ते झाले
स्वप्न माझ्या मनाचे
ऋण स्वामींचे

आकाशी त्याने 
घेतली ती भरारी
पक्षाप्रमाणे


आई.... बाबा

आई.... गळ्यातील तुळशीची माळ
तर बाबा त्यातील गुंफलेला दोरा

आई.... घरातील मातीची चूल 
तर बाबा चुल्हीत जळणारं लाकुड

आई.... घरातील चुलीवरची भाकर
तर बाबा भाकरीला शेकणारा तवा

आई.... देव्हाऱ्यात जळणारी वात
तर बाबा वातीला सावरणारा दिवा

आई.... लेकराची छाया
तर बाबा न दिसणारी माया


अदृश्य मन

सुख दुःखाच्या भावना
क्षणात गवसतात
अदृश्य मनाला 
सहज समजतात


अदृश्य अश्रू

अदृश्य ते अश्रू मनातील माझ्या होते
         का ते हृदयाच्या आत दडले होते
             भंग झाल्या भावना माझ्या
        का ते डोळ्यातून वाहत नव्हते
             शांत मनालाही विचलित करत होते
        अदृश्य ते अश्रू मनातील माझ्या होते
             


Friday, October 7, 2022

स्त्री हे देवीचे रूप

स्त्री हे देवीचे रूप असते
रात्रंदिवस कष्ट ती करते 
दुसऱ्यांच्या सुखासाठी
स्वतःच मन मारून जगते


Monday, October 3, 2022

बापूजींचे विचार.... हायकू

बापूजी एक 
जनसुधारक व्यक्ती
विचार शक्ती.

अमूल्य होते
आयुष्य ते बापूंचे
विचार त्यांचे

बापूंनी केला
विजय तो सत्याचा
पराक्रमाचा

बापूजी एक 
महान थोर व्यक्ती
धन्य ती मूर्ती


बापूजींची साधी राहणी

गांधीजी बॅरिस्टर झाले. आणि आफ्रिकेत गेले.आफ्रिकेत गेल्यावर त्यांनी पाहिले की होते लोकं काळ्या लोकांवर अन्याय करत आहेत. त्यांनी काळ्या लोकांना संघटित केले. होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सत्याग्रह केला. 

गांधीजी बॅरिस्टर असल्यामुळे त्यांचे राहणीमान चांगले होते.ते नेहमी सुट बुट ह्या वेशात असत. आफिकेतून नंते ते भारतात आले. त्यांचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले होते . त्यांनी गांधीजींना संपूर्ण भारत देशात भ्रमण करण्यास सांगितले आणि देशाची सामाजिक परिस्थिती समजून घेण्यास सांगितले. गांधीजी भारतात खेड्यापाड्यातून फिरले. तेव्हा त्यांनी बघितले की लोकांची इतकी वाईट परिस्थिती आहे, की त्यांना अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडे पण नाही . लोकं अर्ध्या कपड्यात राहतात. म्हणुन त्यांनी पंचा वापरायला सुरुवात केली. कितीही मोठ्या व्यक्तीला भेटायला जायचे असेल तरीही ते पंचाच नेसून जात. अगदी इंग्लंडला झालेल्या परिषदेला ही गांधीजी पंचा नेसूनच गेले होते. 

गांधीजी पंचाचा पूर्ण वापर करत असत. पंचा फाटल्यावर त्याचा उपयोग अंग पुसण्यासाठी टॉवेल म्हणून ते करीत असत. तो टॉवेल ही खराब झाला की रुमाल म्हणून वापरत असत. आणि सर्वात शेवटी त्याचा ते कागद बनवायला वापर करत.
गांधीजी पाण्याचा वापरही आवश्यक तेवढाच करत असत.
टॉलस्टॉय तसेच अन टू द लास्ट हे पुस्तक लिहिणारे रस्किन इत्यादी विचारवंतांचा गांधीजींवर प्रभाव होता.टॉलस्टॉय यांनी लिहिलेली खालील गोष्ट फार बोलकी आहे.
एक माणूस असतो. त्याला सांगितले जाते की, सुरू उगवल्यापासून मावळेपर्यंत तो जेवढा धावेल व मूळ जागी परत आला तर तेवढी त्याच्या मालकीची जमीन होईल. तो धावायला सुरुवात करतो. धावताना त्याला दमायला होते. तरी तो आराम करण्यासाठी, जेवणासाठी तसेच पाणी पिण्यासाठी ही थांबत नव्हता. अजून जमीन मिळण्याच्या हव्यासापोटी तो सतत धावत होता. सूर्यास्त व्हायला आला तरीही तो धावत राहिला. अखेर मूळ जागी परत जाण्यासाठी वळला तोपर्यंत त्याच्या अंगातले त्राण संपले. तो जमिनीवर पडला आणि नंतर तो कधीही उठू शकला नाही जमिनीच्या हव्यासापोटी त्याला स्वतःचे प्राण गमवावे लागले. 
या लेखातून हेच सांगायचा प्रयत्न केला आहे की आपण बहुतेक जण अधिक भौतिक सुखाच्या मागे लागलो आहे . या तथाकथित सुखासाठी पर्यावरणाचा नाश होत आहे. तो आता थांबवायला हवा.

तात्पर्य - वस्तूंचा पूर्ण वापर करावा आणि सध्या व पर्यावरण स्नेही राहणीमानाचा स्वीकार करावा...


बापूजी

बापूंचे अमूल्य विचार
करूया आपण आत्मसात
सत्य अहिंसा प्रेम सदाचार
येईल आपसूकच भारतात

बापूंच्या अमूल्य विचारांना
देऊया आपण सन्मान
नुसत्या नोटांवर छापून
राहणार नाही त्यांना मान


स्त्री शक्ती



स्त्री ही असते
घराचा शिल्पकार
देते आकार

स्त्री वीणा नाही
घराला घरपण
मिळे दर्पण

चोवीस तास
करते स्त्री नोकरी
घर चाकरी

घराची लक्ष्मी
ती हाऊस वाईफ
जगते लाईफ


happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...