Thursday, October 20, 2022

एकाकी जीवन

एकाकी जीवन जगताना
आयुष्याच्या सर्व वाटा बंद होऊन जातात
मग डोळ्यांच्या पापण्याही ओल्या होऊन सांगतात
साथ कुणाची नाही एकटा आलाय एकटाच जाशील
असं एकवटलेल्या मनाला ओरडुन ओरडुन सांगतात
एकटेपणाची जाणीव करून देतात....
आयुष्यातील काही क्षण
सुखाच्या वाटेवर दुःखाची वाट घेऊन येतात
आपल्याला एकटेपणाची जाणीव करून देतात
खूप अवघड असतं हे एकाकी जीवन जगणं
काही लोकं आयुष्यात काही क्षणापुरते येतात
तर लगेच दूर निघून जातात....
शेवटपर्यंत एकटेपणाची खंत मनात देऊन जातात....

......................................................

किती सावरावं स्वतःला 
किती सांगड घालावी मनाला
आवरत नाही आता भावना
अर्थ नाही राहिला जीवनाला....
....................................................


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...